बिग स्टोरी
rat२५p३७.jpg-
66200
दापोली ः चिरेखाणींवर काम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधताना तहसीलदार अर्चना बोंबे.
rat२५p३८.jpg-
66201
चिपळूण ः येथील प्रांताधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने दाखले देण्यास सुरवात झाली आहे.
rat२५p३९.jpg-
चिपळूणचे तालुका कृषी अधिकारी श्रत्रुघ्न म्हेत्रे यांचे अभिनंदन करताना पालकमंत्री उदय सामंत.
rat२५p४०.jpg-
66203
चिपळूण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सजवलेले प्रवेशद्वार.
rat२५p३०.jpg-
N66184
रत्नागिरी उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय.
rat२५p३१.jpg-
66185
ऑफिस व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमची माहिती देताना डीवायएसपी नीलेश माईनकर.
----------------------------
शंभर दिवसानंतरही
हवी कृतीमध्ये गती
क्रमांक मिळाल्याने सातत्य हवे : नागरिकांच्या समाधानाला हवे महत्व
इंट्रो
मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयानी कोकण विभागात पहिल्या तीन क्रमांकात स्थान पटकावले. शासकीय कार्यालयांची ही कामगिरी म्हणजे जिल्ह्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा व नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात या कार्यालयांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. अधिकाऱ्यांच्या प्रभावी व कल्पक अंमलबजावणीमुळे जिल्ह्याचे प्रशासन अधिक नागरिकाभिमुख, कार्यक्षम व आधुनिक झाले आहे. प्रशासनाच्या कामात सातत्य राहिले पाहिजे. शंभर दिवसानंतरही प्रशासनाची कृतीमध्ये गती राहिली तरच नागरिकांचे समाधान होणार आहे. मात्र शंभर दिवस कृती आराखड्यात नेमक्या कोणत्या बाबी राबविल्या त्याचा आढावा..
- मुझफ्फर खान, राजेश शेळके
-----------------
पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावणारे कार्यालय
* प्रथम क्रमांक ः उपविभागीय अधिकारी चिपळूण, उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण, तालुका कृषी अधिकारी चिपळूण, तहसीलदार दापोली
* द्वितीय क्रमांक ः चिपळूण पालिका, सहाय्यक निबंधक रत्नागिरी, तालुका कृषी अधिकारी खेड, तालुका कृषी अधिकारी लांजा
* तृतीय क्रमांक ः उपकोषाधिकारी चिपळूण, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नागिरी, दुय्यम निबंधक दापोली, महावितरण उपविभाग लोटे,
-------------------------
उपविभागीय कार्यालयातील पारदर्शक कारभार
चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार अधिक पारदर्शक झाला आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यातील नागरिकांची सनद माहिती अधिकार अधिसूचना १ ते १७ बाबी, सेवा हमी कायदा अधिसूचना अद्ययावत करून जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. लोकसेवा हक्क अधिनियमांअतर्गत २४ सेवा अधिसूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुलभतेसाठी संकेतस्थळ, आपले सरकार पोर्टल व लोकसेवा हक्क अधिनियम पोर्टल यांचे क्युआर कोड तयार करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. महसूल विषयक देण्यात येणाऱ्या सेवांचे बारकोड तयार करण्यात आले आहे. त्यांचा ५१५ नागरिकांनी लाभ घेतला आहे. कार्यालयाचे व्हॉटस अॅप चॅनेल तयार करण्यात आले आहे. त्यावर १५० जण सक्रीय आहेत. कातकरी समाजाला पिवळे रेशन कार्ड आणि मंडळ स्तरावर दाखले वाटप करण्यात आघाडी घेतली. कोकण विभागात सर्वाधिक १५०१ जिवंत सातबाराचे वितरण करण्यात आले. या कार्यालयातून मिळणाऱ्या दाखल्यांसाठी नागरिकांना वाट बघावी लागत नाही किंवा अधिकाऱ्यांना भेटावे लागले नाही. दाखल्यांचा गट्ठा घेवून शिपाई सुद्धा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जात नाही. संबंधित विभागातून प्रांताधिकाऱ्यांना दाखले मेल केले जातात. प्रांताधिकारी त्याची पडताळणी करून डीजिटल सही करतात आणि पुन्हा ते दाखले संबंधित विभागात जातात. जानेवारी २०२४ पासून आतार्यंत तब्बल १५ हजार दाखल्यांचे वितरण झाले आहे. याच पारदर्शक पद्धतीने विविध परवानग्याही दिल्या जात आहेत.
चौकट
लोटे, परशुरामच्या भूसंपादनाचा विषय ७ दिवसात सोडवला
लोटे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी लोटे परशुराम पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेच्या भूसंपादनाची प्रश्न ३० वर्षापासून प्रलंबित होता. प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी प्रादेशिक अधिकारी रत्नागिरी एमआयडीसी, लोटे परशुराम उद्योजक संघटना आणि स्थानिकांची बैठक घेवून अवघ्या सात दिवसात सुधारित सहविभाजन पत्रक तयार केले आणि मार्च २०२५ मध्ये हा प्रश्न सोडवला. २ एप्रिल २०२५ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात व्यापारी व उद्यौजकाची बेठक घेवून त्यांचे २३ प्रश्न सोडवण्यात प्रांताधिकारी कार्यालयाला यश आले. तसेच १५ एप्रिल २०२५ ला माटे सभागृहात बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या व कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा करून १५ प्रश्न सोडविण्यात आले.
चौकट
पूरमुक्तीसाठी प्लास्टिक संकलनाची मोहीम
चिपळूण शहर व परिसरात आलेल्या महापुरामध्ये प्रमुख कारणीभूत ठरलेल्या घटकांपैकी प्लास्टिक हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे शहरातील प्लास्टीक गोळा करून त्यावर रिसायकलींग प्रक्रिया राबविण्यासाठी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी पुढाकार घेतला. सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या व इतर प्लास्टिक संकलित होण्यासाठी लोखंडी जाळीचे पिंजरे जागोजागी बसवण्याचा उपक्रम सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या मदतीने हाती घेण्यात आला. लोकसहभागातून हे पिंजरे उपलब्ध करून ते शहरात ४१ ठिकाणी बसवण्यात आले आहे.
-----------
चौकट
एका क्लिकवर मोबदला
मौजे फुरूस (चव्हाणवाडी) येथील साठवण तलावासाठी २१.८९.३० हे.आर इतक्या जमिनीचे संपादन झाले आहे. या भूसंपादन प्रकरणी ४१२ खातेदारांना ७५ टक्के मोबदला ऑनलाईन पद्धतीने एका क्लिकवर एकाच दिवशी आणि एकाच वेळी देण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी राबविला.
---------------
चिपळूणच्या कृषी विभागाचे प्रभावी काम
रत्नागिरी जिल्ह्यात कातळ जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने शेततळे पर्याय म्हणून जलकुंड योजना राबवली जाते. चिपळूण तालुक्यात ५३ जलकुंड बांधण्यात आली आहेत. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फळमाशी नियंत्रणासाठी आंबा बागायतदारांना २८०० हेक्टरसाठी जवळपास ११ हजार ९६ रक्षक सापळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी २१७ पेस्टोसीसचे वाटप करण्यात आले आहे. आंबा निर्यातीस चालना देण्यासाठी तालुक्यात अपेडा नोंदणी व जीआय नोंदणीसाठी कार्याशाळा घेण्यात आली. १ हजार १५३ शेतकऱ्यांचे तब्बल ८५४.२३ हेक्टर क्षेत्राची नोंदणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून करण्यात आली. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत १४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ८ अर्जाना मंजुरी देवून ४१ लाख २५ हजाराचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प योजनेतून माय कोकण फार्मर प्रोड्युसर कंपनीला प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. चिपळूणच्या कृषी विभागाने व्हॉटस अॅप चॅनल तयार केले आहे. विविध योजना व उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना या चॅनलद्वारे दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यासाठी स्वतंत्र पीएम किसान कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण व त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाते. आतापर्यंत चिपळूण तालुक्यातील २२ हजार ६३५ लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. क्युआर कोडद्वारे सुकर जीवनमान योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. सोशल मिडियाद्वारे योजनेचा प्रचार सुरू आहे. अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढण्यासाठी प्रत्येक गावांमध्ये शिबिर घेतले जातात.
-----------
कार्यालयीन कामकाजही ऑनलाईन
चिपळूण कृषी अधिकारी कार्यालयाचा कामकाजही आता ऑनलाईन झाला आहे. कार्यालयातील अभिलेख निंदणीकरण व वर्गीकरण पूर्ण झाले आहे. एकूण ७ हजार ३५० फाईंल्सची संख्या आहेत. जुन्या निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली आहे. आपले सरकार व पी. जी. पोर्टवरील तक्रारीचे सातत्याने निराकरण केले जात आहे. आतापर्यंत ७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यालयात अभ्यागतांच्या भेटीचे नियोजन केले जाते. त्यासाठी वेळ ठरवून दिला जातो. त्यांच्यासाठी सूचना व तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यात तहसील कायालयामध्ये दर महिन्याच्या तसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------
दापोलीत राबविलेले उपक्रम
रत्नागिरी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दापोलीची स्वतंत्र माहिती अद्ययावत करण्यात आली. सुकर जीवनमान अंतर्गत प्रत्येक मंडळात शिबिरे घेऊन ४५०० पेक्षा जास्त लोकांना विविध सेवांचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी दंत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व आर्थिक साक्षरता साठी शिबिरे आयोजित करण्यात आली. तालुक्यातील ए. कु. प. नोंदींचा शोध घेऊन मूळ मयत खातेदारांच्या सर्व वारसांची ७/१२ वर नोंद करण्यात आली. तहसील कार्यालय, सुवर्णदुर्ग किल्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतागृह दुरुस्ती करण्यात आली. विविध ऑनलाईन पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्यात आले. नागरिकांना जलद गतीने व सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने विभागांच्या विविध सेवांचे ऑनलाईन क्युआर कोड तयार करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, वाचनकट्टा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली. कार्यालयामध्ये नामफलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले. चिरेखाणीवर काम करणाऱ्या मजुरांची वैद्यकीय तपासणीचा उपक्रम राबविण्यात आला. ई ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
--------------
चौकट
चिरेखाण कामगारांकडे विशेष लक्ष दिले
तहसीलदार कार्यालय दापोली, तसेच चिरेखाण व्यावसायिकांच्या संयुक्त उपक्रमाने मौजे खेर्डी व बोंडीवली येथील चिरेखाण कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. चिरेखाण क्षेत्रातील कामगारांची ओळख पटवून महिला ४८ व पुरुष ६३ असे एकूण १११ कामगारांची खेर्डी आरोग्य उपकेंद्राकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यक औषधे वितरित करण्यात आली, गंभीर आजारांसाठी रुग्णांसाठी नियमित पाठपुरावा यंत्रणा स्थापित केली. तसेच तहसीलदारांनी चिरेखाणीवर जाऊन चिरेखाण कामगारांना स्वच्छ पाण्याची, राहण्याची, विजेची सुविधा उपलब्ध आहे की नाही याची खात्री केली.
----------------------------------
गुणात्मक कामामुळे रत्नागिरी डीवायएसपी कार्यालय कोकणात तिसरे
क्षेत्रीय कार्यालयातील सुधारणा कार्यक्रमांचे मुल्यमापन, डायल ११२ ला १० मिनिटांत प्रतिसाद, पीडित व्यक्तीला तत्काळ मदत, डीवायएसपी कार्यालयात हेलपाटे न घालता परवाने, आपले सरकार पोर्टलवरील विविध अर्ज ७ दिवसात निकाली, ऑफिस व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम, कार्यालयाली फायलिंगला नंबर केल्याने मिळणे सोपे, सीसीटीव्ही अद्ययावत केले, कर्मचाऱ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था केली, प्रलंबित गुन्ह्यांवर विशेष लक्ष देऊन ते तत्काळ निकाली काढले, अशा प्रकारे गुणात्मक आणि दर्जेदार काम करून शानसाच्या ७ कलमी १०० दिवसाच्या कार्यक्रमात रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाने कोकण परिक्षेत्रातील २१ कार्यालयामध्ये तृतीय क्रमांकावर झेप घेण्याची कौतुकास्पद कामगिरी केली. शंभर दिवसाच्या या कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांनी पुढाकार घेऊन उपक्रम राबवले.
-----------
कार्यालयीन कामकाजात आणली शिस्त सोडवले प्रश्न
क्षेत्रीय कार्यायातील सुधारणा कार्यक्रम राबवून कार्यालयीन कामकाज व तक्रार निवारण कामकाजासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यालयीन कामकाजामध्ये शिस्त आणली. कर्मचाऱ्यांची बसण्याची चांगली व्यवस्था केली. फायलिंग प्रॉपर नंबरिंग सिस्टीम राबविण्यात आली. फायलींना क्रमांक देऊन ती कोणत्या कपाटात आहे, याची यादी केली. त्यामुळे एखादी फाईल मागविल्यानंतर ती मिळायला सोपी जाते. कार्यालयात येणाऱ्या व्यक्तीसाठी नकाशा तयार केला आहे. आपण कशासाठी आलो आहे आणि कोणत्या टेबलला आपल्याला जायचे आहे, हे त्या नकाशावरुन समजते. त्यामुळे त्या व्यक्तीचा गोंधळ उडत नाही. तक्रारीसाठी येणाऱ्या व्यक्तीला चांगली वागणूक देत त्याचे म्हणणे एकून घेतले जाते. त्याला योग्य मार्गदर्शन करून त्यांची तक्रार घेतली जाते. तसेच आपले सरकार पोर्टलवर आलेले अर्ज ७ दिवसात निकाली काढले जातात. डीवाएसपी कार्यालयाकडून नागरिकांना विविध कामांसाठी परवाने लागतात. ते परवाने काढण्यासाठी त्यांना कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज नाही. अर्ज केल्यानंतर आम्हीच त्यांना संपर्क करून काम झाले की त्यांना फोनकरून बोलवून परवाने दिले जातात. यामुळे त्या व्यक्तीचे हेलपाटे वाचतात.
------------
गुन्हे काढले निकाली
ऑफिस व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम बसवली आहे. यामध्ये येणाऱ्या व्यक्तीचे नाव टाकले जाते. त्याचे काम काय लिहिले जाते. काम झाल्यानंतर नाव, काम सांगतो. काम झाल्याने अभिप्राय देतात. अभिप्रायामध्ये अनेकजण कौतुक करतात, तर काही जण त्रुटी दाखवून देतात. त्यामध्ये सुधारणा केली जाते. पोलिस ठाण्यात नवीन खुर्च्या बसण्यासाठी, पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी टार्गेट धरून काम केले. अनेक गुन्ह्यांमध्ये मेडिकल सर्टीफिकेट, आरटीओंचे सर्टिफिकेट नसल्याने राहिली होती. त्याची पूर्तता करून प्रलंबित असलेले गुन्हे निकाली काढण्यात आले. अपघात व अन्य किरकोळ गुन्हे तर चार दिवसात निकाली काढण्यात आले. मुदतबाह्य मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
पोलिस ठाण्याच्या आवारातील बेवारस वाहने आणि इतर वस्तूंचा लिलाव केला. आठवड्यातून दोनवेळा क्षेत्रीय कार्यालयाला भेटी दिल्या. अशा प्रकारे अन्य विभागामध्ये रत्नागिरी डीवायएसपी कार्यालयाने शासनाच्या १०० दिवासच्या कार्यक्रमामध्ये उत्तम कामगिरी करून कोकण परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधील २१ डीवाएसपी कार्यालयांमध्ये रत्नागिरी डीवायएसपी कार्यालय तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.
--------------
चौकट...
चारित्र्य पडताळणी अर्ज १०० टक्के निकाली
रत्नागिरी शहर, ग्रामीण पोलिस ठाणे, संगमेश्वर पोलिस ठाणे, जयगड आणि पुर्णगड या पाच पोलिस ठाण्याचे एकूण १४१९ चारित्र्य पडताळणी अर्ज होते. त्यापैकी सर्वच्या सर्व १०० टक्के अर्ज निकाली काढण्यात आले.
------------
चौकट...
कार्यक्षेत्राबाहेरही काम
रत्नागिरी डीवायएसपी कार्यालयाने कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कामगिरी केली आहे. उन्हाळ्यामध्ये जनावरांना सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचा कुंड बांधला आहे. अनेक जनावरांना उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. एक गाय कार्यालयाच्या कंपाऊंडमध्येच प्रसुत झाली होती. परंतु नवजात वासराला दुध पिता येत नव्हते. बाटलीने त्याला दुध पाजले. दोघांवर उपचार करून चांगल्या शेतकऱ्याला संगोपनासाठी ती गाय दिली.
------------
66197
66198
66199
66182
rat२५p३४.jpg- आकाश लिंगाडे
rat२५p३५.jpg- शत्रुघ्न म्हेत्रे
rat२५p३६.jpg- मन्सूर कास्कर
rat२५p३७.jpg- मुश्ताक सय्यद
rat२५p२८.jpg- निलेश माईनकर
------------
कोट
आमचे कर्मचारी व अधिकारी यांना सेवा विषयक बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जात आहे, पदोन्नती व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण वेळेवर केले जात आहे. नवनियुक्त क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना ई ऑफिस व ई चावडीचे प्रशिक्षण दिले जात आहे. सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कार्यालयाचे आधुनिकीकरण केले आहे. प्रांताधिकारी कार्यालयात लवकर काम होईल या अपेक्षेने येणारे नागरिक समाधानी होऊन परत जातात.
--आकाश लिंगाडे, प्रांताधिकारी, चिपळूण
------------------
कोट
कायालयीन देयके हे ऑनलाईन प्रणालीद्वारे अदा केली जातात. शेतकऱ्यांना विविध योजनाचा लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने दिला जातो. कार्यालयीन पत्रव्यवहार डीजिटल स्वाक्षरीने होतात. महाकृषी अॅपद्वारे कृषीच्या विविध मोहिमा राबवल्या जातात. शेतीशाळांची अंमलबजावणी केली जाते. कृषी योजनांचे सर्व अहवाल महाकृषी अॅपवर उपलब्ध करण्यात आले आहे. नव्याने सेवेत आलेल्या १२ पैकी ७ कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
--शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण
----------------
कोट
सर्वोत्तम तहसील कार्यालयामध्ये दापोली तहसील कार्यालयाचा समावेश झाला याचा आनंद वाटतोय. हे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हे यश म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी सर्वांनी केलेल्या सामुहिक प्रयत्नांची पावती आहे. आगामी काळात महसूलच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. हे यश मिळाल्यामुळे सर्व अधिकारी ,कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार.
--अर्चना बोंबे, तहसीलदार, दापोली
-------------
कोट
सर्वोत्तम उपकोषाधिकारी कार्यालयामध्ये चिपळूण उपकोषाधिकारी कार्यालयाचा समावेश झाला याचा आनंद वाटतोय. हे यश आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हे यश म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी सर्वानी केलेल्या सामुहिक प्रयत्नांची पावती आहे. आगामी काळात वित्तविभागाच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. हे यश मिळाल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार.
--मन्सूर कास्कर, उपकोषागार अधिकारी, चिपळूण
------------------
कोट
शासनाने दिलेल्या १०० दिवासाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही टार्गेट धरून काम केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनासह कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले. गुणात्मक आणि दर्जेदार काम केल्यामुळे शासनाने या कामाची दखल घेतली. स्वच्छतेवर अधिक भर दिला, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा केला, ११२ टोल फ्री क्रमांकाला १० मिनिटाच्या आत प्रतिसाद दिला. येणाऱ्या नागरिकाला चांगली वागणूक दिली. अर्ज ७ दिवासात निकाली काढले. कामात सुसुत्रता आणली. या कामाची पोचपावती शासनाने दिली.
-नीलेश माईनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, रत्नागिरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.