भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ
मालवणात आज तिरंगा रॅली
मालवण, ता. २५ ः भारताच्या निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय लष्कराच्या या धाडसी कामगिरीचा सन्मान करण्यासाठी मालवणमधील नागरिकांनी उद्या (ता. २६) सकाळी १०.३० वाजता भरड दत्तमंदिर ते मालवण बंदर जेटी मार्गावर तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी (भूदल, नौदल, वायुदल) शौर्य, कौशल्य, अचूकता, समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाला आपली ताकद दाखवून देणारे होते. या ऑपरेशनने पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देत भारताच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे. भारतीय सैनिकांनी केलेल्या या पराक्रमाबद्दल आणि त्यांच्या सन्मानार्थ मालवणवासीयांनी एकत्र येऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय सैनिकांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही भारतीय लष्करासोबत सदैव राहू, हा संदेश देण्यासाठी सर्वांनी या तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन धोंडू चिंदरकर, विष्णु मोंडकर, राजा गावकर, भाऊ सामंत, संदिप बोडवे, सहदेव साळगावकर यांच्यासह मालवणमधील अनेक देशभक्त नागरिकांकडून करण्यात आले आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि जवानांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी आयोजित ही तिरंगा रॅली मालवणमधील नागरिकांच्या राष्ट्रभक्तीचे प्रतीक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.