कोकण

चहा लागवडीचे पारंपरिक शेतीवर परिणाम

CD

जपूया बीजवारसा---------लोगो
(१३ मे टुडे ३)
सत्तरच्या दशकात पारंपरिक शेती, आदिम बियाणी याबाबत कशा प्रकारे चळवळी सुरू झाल्या आणि त्यानुसार संस्थात्मक कार्य कसे उभे राहिले हे आपण समजून घेत होतो. त्यांनी शासनाला शेतीविषयक ध्येयधोरणे ठरवायला कशी मदत केली, याबाबत आपण समजून घेणार आहोत. २१ मे दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन अंतर्गत असलेल्या इंटरगव्हर्नमेंटल ग्रुप ऑन टी यांनी चहाच्या मळ्यांमधील कामगारांचे हक्क संरक्षण, चहाच्या मळ्याचे मालक, युनियन आणि सरकारांमधील सामंजस्य तसेच आंतरराष्ट्रीय चहाव्यापारात सुसुत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्याचे ठरवले. भारतातील चहा लागवड कशी सुरू झाली आणि त्याचे आपल्या पारंपरिक शेतीवर काय परिणाम झाले, ते या निमित्ताने जाणून घेऊया....

rat२६p१०.jpg -
25N66325
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टीज्ञान संस्था
---
पारंपरिक शेतीवर
चहा लागवडीचे परिणाम

जगात पाण्यानंतर प्यायले जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे पेय म्हणजे चहा ‘कॅमेलिया सिनेन्सिस’ या झु़डपांच्या पानांपासून बनवला जातो. चहाचा उगम हा चीनमध्ये झालेला आहे. चहाच्या उत्पादनात चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तर प्रतिवर्षी/प्रतिव्यक्ती सर्वाधिक चहा पिणाऱ्यांमध्ये तुर्कीये देशाचा पहिला क्रमांक लागतो. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी चहा युरोपमध्ये प्रथम नेला; पण ब्रिटिशांनी चहाला व्यापार-राजकारण-आहार संस्कृतीमध्ये रूजवले.
युरोपीय देशात सर्वांना चहा पुरवण्याची जबाबदारी ही ईस्ट इंडिया कंपनीची होती. हा सर्व चहा मुख्यत: चीनमधून मिळवला जात होता; पण चहाचे रोप नेमके कसे दिसते, त्याची लागवड कशी करतात, त्यावर कोणत्या प्रक्रिया करून चहा बनवला जातो या विषयी चिनी लोकांनी पूर्णपणे गुप्तता ठेवली होती. त्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने एक योजना आखली. त्या अंतर्गत ‘रॉबर्ट फॉर्च्युन’ या वनस्पतीतज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली गेली. १८४८ मध्ये रॉबर्ट फॉर्च्युनने चिनी व्यक्तीसारखीच वेषभूषा करून शांघायमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तीन वर्षे प्रचंड प्रवास करून मोठ्या कष्टाने चहाची लागवड आणि त्याच्या पानांपासून चहा कसा तयार होतो, हे सारे अभ्यासले. १८५१ मध्ये तो परत जायला निघाला तेव्हा त्याने १३ हजार रोपे, १० हजार बिया आणि काही चहा पिकवणारे शेतकरीही सोबत घेतले होते. रॉबर्ट फॉर्च्युन यांनी आणलेली काही रोपेच जगली होती. ही रोपे बिया आणि चहा पिकवणारे शेतकरी यांच्या मदतीने १८५१ मध्ये डॉ. कॅम्पबेल यांनी दार्जिलिंगच्या डोंगररांगांवर चहाची लागवड करायला सुरुवात केली. दार्जिलिंगची असलेली समुद्रसपाटीपासूनची उंची, तिथली सुपिक माती, तापमान आणि एकूणच हवामान या चहाला असे काही मानवले की, दार्जिलिंग चहा हा त्याच्या रंग आणि मधूर सुगंधाने चहामधली शॅंपेन बनला. भारतात मात्र चहाची लागवड अठराव्या शतकाच्या सुरुवातीलाच झाली होती. आसाममधील स्थानिक आदिवासी काही पानांचा काढा पित असत. ती आसाममधील चहाची जंगलातली प्रजाती होती. ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट ब्रुस याने एकदा याची चव घेतली तर तो चहा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने १८०० मध्ये या प्रजातींची लागवड करायला सुरुवात केली आणि १८२३ मध्ये पहिल्यांदा आसाम चहा इंग्लंडमध्ये पाठवला गेला. त्यानंतर इंग्लंडमधील लोक या चहाच्या रंग, गंध आणि चवीने मोहून गेले याशिवाय तामिळनाडूमधील निलगिरी, केरळमधील मुन्नार, कर्नाटकातील कोडागु (कुर्ग) आणि चिकमंगळूर, हिमाचल प्रदेशमधील कांगडा आणि सिक्कीम हे भाग चहा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत.
निर्यातीवर भर असलेल्या चहाच्या व्यावसायिक शेतीमुळे त्या भागातील स्थानिक पारंपरिक शेतीपद्धती, आदिम बियाणी, अन्नधान्य पिके संपुष्टात आली. जंगलतोड झाली, अन्नधान्य बाहेरून आणल्यामुळे त्यावर अवलंबित्व वाढले. एकाच प्रकारचे पीक घेतल्यामुळे त्या भागातील जैवविविधता नष्ट झाली. मातीचा कस गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे त्या भागातील पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. चहाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागत असल्याने पाण्याचे स्थानिक स्रोत घटत आहेत. चहा पित असताना आपण या समस्यांच्या बाबतीतदेखील जागरूक राहिले पाहिजे.

(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनदा लग्न, प्रियकरानंही गर्भवती होताच सोडलं; 43 वर्षीय आईनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या, अंगावर काटा येणारं कारण समोर...

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी; २७४ मूर्ती स्टॉल्ससाठी ७ ऑगस्टला लिलाव

Latest Maharashtra News Updates Live: सर्वाधिक डान्सबार रायगडमध्ये

Shiv Sena Protest : भगव्याचा अपमान अजिबात खपवून घेणार नाही : युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक

धक्कादायक! लोकप्रिय युट्युबर Red Soil Storiesचे शिरीष गवस यांचे निधन; कोरोनाकाळात पत्नीच्या साथीने उभं केलेलं नवं विश्व

SCROLL FOR NEXT