swt267.jpg
66373
आसोली ः कुकेरखिंड येथे मातीचा भराव खचल्याने वीज खांब कोसळण्याच्या स्थितीत आहे.
आसोली-कुकेरखिंड येथे
वीज खांब धोकादायक स्थितीत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ ः वेंगुर्ले तालुक्यातील आसोली (कुकेरखिंड) येथील रस्त्याच्या लगत असलेला वीज खांब मातीचा भराव खचल्याने कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. यामुळे अपघाताची शक्यता असल्याने वीज खांब तात्काळ बदलण्याची मागणी होत आहे.
या रस्त्यावरून येथील ग्रामस्थ, पादचारी, वाहनचालक यांची सतत ये-जा असते. सध्या पावसाचे प्रमाण जोरदार सुरू असून यामुळे सगळीकडे पडझड सुरू झाली आहे. पावसाने मातीचा भराव खचल्याने हा विजेचा खांब कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. त्यात करून या वाडीतून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून ते अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिकीरीचेच आहे. रस्त्यावर माती, चिखल आल्याने रस्ता निसरडा बनला आहे. त्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरतच करावी लागत आहे. त्यामुळे वाहन घसरून एखादी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर याबत योग्य ती उपाययोजना करावी व पुढील होणारी दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.