कोकण

खंडाळा बाजारपेठेत पाणी साचले

CD

खंडाळा बाजारपेठेत
पाणी साचले
रत्नागिरी ः तालुक्यातील खंडाळा परिसरात सध्या पावसाचा जोर वाढला असून, ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याचे चित्र आहे. यात मुसळधार पावासामुळे शनिवारी (ता. २४) खंडाळा येथील मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांच्या हे लक्षात येताच स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टर आणून बाजारपेठेत साफसफाई केली. संपूर्ण खंडाळा बाजारपेठ जलमय झाली होती. खंडाळा बाजारपेठेतील शेखर भडसावळे यांच्या दुकानासमोर व रस्त्याच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात पाणी अडत होते. ते पाणी उपसा करण्याचे काम अनिकेत सुर्वे यांनी केले तसेच संपूर्ण खंडाळा बाजारपेठेत स्वच्छतामोहीम राबवली. या वेळी वाटद गावचे सरपंच अमित वाडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिगवण, रिक्षा संघटना व व्यापारी बांधवांनी सहकार्य केले. हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल वाटदचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांचे खंडाळा परिसरातून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

नाले-गटारे
नाहीत तुंबली
रत्नागिरी ः शहरातील नाले आणि गटारांची स्वच्छता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्ण झाली. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुठेही नाले, गटारे तुंबल्याची तक्रार पालिकेकडे आली नाही. गेल्या वर्षी पहिल्याच पावसात रामआळी आणि आजुबाजूच्या बाजारपेठेत पाणी तुंबून रस्त्यावर आले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वीची साफसफाई ही एप्रिल महिन्यापासूनच सुरू होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि तक्रारीनुसार नाले, गटारांची स्वच्छता केली जात असते. मॉन्सून साधारणः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असते; मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून शहरातील नालेगटारे स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते. शहरातील १० मोठे नाले आणि गटारांची एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली साफसफाई मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण झाली. त्यामुळे मे महिन्यात पडलेल्या पावसाने नाले आणि गटारे तुंबल्याची तक्रार पालिककडे आली नसल्याचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले.


चक्रभेदीतर्फे महिलांशी
गृहभेटीत संवाद
साखरपा ः चक्रभेदी सोशल फाउंडेशन देवरूखतर्फे परिसरातील निराधार, गरजू, विधवा आणि एकल महिलांच्या घरी जाऊन त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या वेळी त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न संस्थेच्या वैदेही सावंत करत आहेत. देवरूख येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन ही संस्था विधवा आणि एकल महिलांच्या प्रश्नांसंबंधी कार्यरत आहे. या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी संस्थेतर्फे या आधी विधवा आणि एकल महिलांचे हळदीकुंकू आयोजित करण्यात आले होते तसेच शिव्यामुक्त गाव हे अभियानाही काही गावांमध्ये संस्थेतर्फे राबवण्यात आले होते. सध्या या संस्थेतर्फे परिसरातील गरजू आणि निराधार महिलांचे प्रश्न समजून घेण्यावर भर देण्यात येत आहे. संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत या सध्या परिसरातील अशा महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

rat२६p७.jpg -
KOP२५N६६३३६
मृग कीटक

मृगाआधीच
मृगकीड्याचे दर्शन
साखरपा ः मृग नक्षत्राच्या आगमनाची वर्दी देणारे मृग कीटकांचे दर्शन यंदा मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच झाले आहे. गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे या कीटकांचे आगमन शेतातून झाले आहे. मृग नक्षत्र हे जूनच्या सात तारखेच्या दरम्यान सुरू होते. त्याचवेळी जमिनीवर ठिकठिकाणी मृग हे अष्टपाद कीटक दिसत असत. लाल रंगाचे, वेलवेटसारखी पाठ असलेले हे कीटक अत्यंत आकर्षक दिसत असत. हे कीटक दिसले की, शेतकऱ्यांना मृग नक्षत्राच्या आगमनाची खात्री पटत असे. हे कीटक जमिनीतून कसे येतात आणि नेमके मृग नक्षत्रात कसे येतात, याबाबत लोकांना खूप कुतूहल आहे. पूर्वी सर्रास दिसणारे हे कीटक आता मात्र अभावाने दिसत आहेत. यंदा हे कीटक मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. सध्या कृतिका नक्षत्र नुकतेच सुरू झाले आहे. हे नक्षत्र सुरू असतानाच म्हणजेच तब्बल एक नक्षत्रआधीच मृग कीटक शेतातून फिरताना दिसत आहेत.


वेरळ ग्रामपंचायतीकडून
कचरा वर्गीकरण
खेड ः वेरळ ग्रामपंचायतीने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वतंत्रपणे कचरा कचरागाडीत टाकण्याकरिता प्रत्येकी दोन डस्टबिनचे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे कचरा गाडीत देतानाच स्वतंत्रपणे दिला जाणार आहे तसेच रस्त्यालगत कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. भरणे ग्रामपंचायतपाठोपाठ वेरळ ग्रामपंचायतीचाही विस्तार झपाट्याने वाढत आहे. ग्रामस्थांना पूरक प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर ग्रामपंचायतीकडून भर दिला जात आहे. तसेच कचरा समस्येवरही लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामपंचायतीने काही महिन्यापूर्वीच कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र कचरागाडी सुरू केली आहे. या कचरागाडीत ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याकरिता ग्रामपंचायतीने पुढाकार घेत रहिवाशांना प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप करण्यास सुरवात केली आहे. संकुलातील रहिवाशांनाही डस्टबिनचे वितरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे याशिवाय रस्त्यालगत कचरा फेकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सरपंच वैदेही घाडगे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी विकास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गाव कचरामुक्त करण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT