GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

GST Slab: केंद्र सरकारने जीएसटी प्रणालीत मोठे बदल प्रस्तावित केलेत. नवीन रचनेत, सामान्य वापराच्या वस्तूंवरील कर ५% पर्यंत कमी केला जाईल. तर लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर ४०% कर लादला जाईल.
GST slab change proposal
GST slab change proposalESakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून एक आनंदाची बातमी दिली. त्यांनी दिवाळीपर्यंत कर कमी करण्यासाठी जीएसटी सुधारणा योजना आणण्याबद्दल बोलले आहे . पंतप्रधान मोदी म्हणाले, या वर्षी दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. जीएसटी येऊन ८ वर्षे झाली आहेत. आम्ही त्याचा आढावा घेतला. आम्ही त्यात सुधारणा करून करप्रणाली सुलभ केली आहे. आम्ही पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. याचा लोकांना खूप फायदा होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com