कोकण

रत्नागिरी रेल्वेस्थानकात गळती

CD

- rat२७p६.jpg-
P२५N६६५२२
रत्नागिरी रेल्वेस्थानक.
---
रत्नागिरी रेल्वेस्थानकात ‘गळती’ सुरूच
पावसाचा फटका; प्रशासनाकडून तातडीने दुरूस्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यात सध्या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या वर्षी येथील अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला दणका दिला. दर्शनीभागातील इमारतीच्या छतातून पुन्हा पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे सुशोभीकरणाच्या गुणवत्तेवर येथील प्रवासीवर्गातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात वादळी पाऊस झाला होता. या पावसाने रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॅडिंगचे मोठे नुकसान झाले होते. सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे टिनचे पत्रे उडून गेले आणि क्लॅडिंग कोसळले होते. यामुळे सुमारे १५ ते २० चौरस फूट छतावर परिणाम झाला होता. या रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या सुशोभीकरण प्रकल्पाचे काम केले होते. त्या दरम्यान संपूर्ण काम पूर्ण होण्यापूर्वीच छताचे नुकसान झाले होते. गेल्या आठवडाभरापासून रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरण केलेल्या इमारतीच्या कामाला पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिला आहे. इमारतीचा दर्शनी भाग आणि प्रवेशद्वाराच्या पूर्वेकडील बाजूला सुशोभीकरणात नवीन बसवलेल्या छताला आणि क्लॅडिंगमधून गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा जोरदार पाणीगळती सुरू झाली. रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वाराच्या भागात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे यंत्रणादेखील हैराण झाली आहे.
रेल्वेस्थानकातील पाणीगळतीच्या गंभीर प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवण्यात आले आहे. त्यानंतर छताला लागलेली पाणी गळती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच धावपळ उडाली. पाणी गळती थांबवण्यासाठी व छताचे क्लॅडिंग निसटू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आली आहेत. त्या ठिकाणी छताच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच छत पूर्ववत होईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

'सैराट' साठी तानाजी गळगुंडेला लाख नाही तर काही हजारांमध्ये मिळालेले पैसे; सगळे मित्राच्या हातात ठेवले कारण...

Latest Marathi News Live Updates: अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू, टेम्पो चालक ताब्यात

ED Raid on Congress MLA : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर 'ED'चे छापे; कोट्यवधींचे सोने अन् रोकड जप्त

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

SCROLL FOR NEXT