कोकण

गावडेआंबेरेमधील विद्युतखांब धोकादायक

CD

गावडेआंबेरेमधील
विद्युतखांब धोकादायक
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे, हनुमानवाडी येथे मुख्य रस्त्यालगत लोखंडी विद्युतखांब असून, तो धोकादायक बनलेला आहे. पावसाळ्यात या खांबाखालून पाण्याचा प्रवाह सतत वाहत असल्यामुळे तो कधीही कोसळू शकतो. त्या खांबाजवळून नेहमीच वर्दळ सुरू असते. हा खांब अंडरआर्म क्रिकेट मैदानाच्या सर्कलजवळ असल्याने त्याचा धोका अधिक वाढलेला आहे. याबाबत संबंधित कार्यालयात एप्रिलच्या हनुमान जन्मोत्सवकाळात तक्रार देऊनही व संपर्क करूनही अद्यापही तो खांब काढून टाकलेला नाही.

शेतात तुडुंब पाणी
अन् पेरण्या खोळंबल्या
संगमेश्वर ः कोकणात २६ मे नंतर भातपेरणीला प्रारंभ होतो. हवामानखाते दरवर्षी देत असलेल्या अंदाजानुसार, १० जूनपर्यंत पेरण्या पूर्ण केल्या जातात; पण यावर्षी १५ मे पासूनच पावसाची सुरुवात झाली. सध्या भातपेरणी ज्या शेतात करायची आहे ती शेती पाण्याने तुडुंब भरलेली आहे. झरे प्रवाहित झाल्यामुळे पेरणी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. कोकणात सर्वदूर ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भातपेरणी करायच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा, काट्याकुट्या वाहून आल्याने साफसफाई केलेल्या शेतांची वाट लागली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सलग चार ते पाच दिवस पावसाने सुटी घेतली तरच पेरण्या होऊ शकतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे अन्यथा यावर्षी ओल्या दुष्काळामुळे मोठी समस्या उभी राहू शकते.

ओमळी गावकरवाडीत
विहीर कोसळली
चिपळूण : ओमळी गावकरवाडी येथील सार्वजनिक विहीर गेले चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे कोसळली आहे. अतिवृष्टीमुळे दोन वर्षांपूर्वी या सार्वजनिक विहिरीचा काही भाग ढासळला होता. त्या वेळीही पंचनामा करण्यात आला होता; परंतु विहिरीचे बांधकाम रखडले होते. मुसळधार पावसाने संपूर्ण विहीर कोसळली आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष कदम यांनी ग्रामसभेत विहिरीबाबत माहिती देऊन बांधकामासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. सार्वजनिक विहीर कोसळली असल्याने तलाठी शिंदे, ग्रामसेवक पवार, कृषी सहाय्यक कणसे यांनी पंचनामा केला. या वेळी सुभाष कदम, सरस्वती कदम, सुयोग कदम, सविता कदम, प्रियांका कदम, पियुष कदम आदी उपस्थित होते.

साखरपा येथे
दाखल्यांचे वितरण
साखरपा ः तालुक्यातील साखरपा ग्रामपंचायत येथे तहसीलदार अमृता साबळे यांच्या आदेशानुसार, साखरपा उपसरपंच शशिकांत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा ग्रामपंचायत येथे २०२५-२६ या अर्थिक वर्षामध्ये शैक्षणिक नोकरी, शासकीय कामकाजाकरिता लागणारे दाखले काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शासनाच्या या नियोजनाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी साखरपा उपसरपंच शशिकांत गुरव, सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ओंकार कोलते, मंडळ अधिकारी नारायण चौधर, साखरपा महसूल अधिकारी अमोल लोकरे, राम खडके, सेतू चालक श्रद्धा सुर्वे, पोलिस पाटील रवींद्र फोंडे, महसूल सेवक शिवकुमार दळवी, संजय जांगली, महेश पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT