कोकण

दशावतार कला गोमंतक भूमीत रुजावी

CD

66557

दशावतार कला गोमंतक भूमीत रुजावी

झिलू गोसावी ः गोव्यात शांतादुर्गा वर्धापन दिनानिमित्त सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः दशावतारी नाट्य कलाकारांचा गौरव क्वचितच होत असतो. या नाट्यकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ही कला वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आज झालेल्या गौरवाने मी भारावलो आहे. येणाऱ्या काळात गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्याचा मनोदय आहे, असे कलावंत झिलू गोसावी यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथील अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे निर्माते झिलू गोसावी यांचा गोव्यातील ब्रह्मा करमळी, सत्तरी येथे गौरव करण्यात आला. गोव्याचे नामवंत शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते श्री शांतादुर्गा देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त हा सत्कार सोहळा झाला. श्री. गोसावी यांनी आजवर २५० दशावतारी नाटकांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. देसाई म्हणाले, ‘‘दशावतार म्हणजे भगवान विष्णूंचे दहा अवतार असून, दशावतारी नाट्यकलेच्या माध्यमातून विष्णूंच्या विविध अवतारांतून निर्माण झालेल्या घटनांचे आध्यात्मिक प्रगटीकरण आणि प्रबोधन होत असते. दशावतारी नाट्यकला ही कोकण, महाराष्ट्र आणि गोव्याची उज्ज्वल हिंदू संस्कृती दर्शवणारी परंपरा आहे. या कलेतून आध्यात्मिक उन्नती साधणे आवश्यक असून, आज ही नाट्यपरंपरा टिकवणे गरजेचे आहे.’’
ॲड. देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन गोसावी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जयसिंग देसाई, रामराव देसाई, अरविंद देसाई यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, म्हापण, वेंगुर्ले यांच्यातर्फे ‘कली आणि मच्छिंद्रनाथ युद्ध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगात महेश गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. या नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जयसिंग देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT