कोकण

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

CD

66573
66626

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

गड, जानवली नद्यांना पूर; कणकवलीत झाड कोसळून घराचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ ः आठ दिवसांपासून होत असलेल्‍या संततधार पावसामुळे मे महिन्यातच जानवली आणि गड नदीपात्रात पूरसदृश स्थिती नागरिकांना पाहायला मिळाली. दरम्‍यान, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी वीज तारांवर फांद्या आणि झाडे कोसळल्‍याने तब्‍बल बारा तास वीज पुरवठा ठप्प होता. जानवली बौद्धवाडीत घरावर फांदी कोसळल्‍याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.
गेले सहा दिवस मॉन्सूनपूर्व सरी जोरदार बसरल्‍या. त्‍यानंतर गेले दोन दिवस कणकवली तालुक्‍यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. त्‍यामुळे मे महिन्यातच जानवली आणि गड नदीपात्र आज दुथडी भरून वाहत होते. याखेरीज ओढे, नाल्‍यांनाही जोरदार पाणी आले होते.
आज सकाळी सहाच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले होते. यात जानवली बौद्धवाडी येथील अनिल कदम यांच्या घरावर झाडाची फांदी कोसळून त्‍यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. याखेरीज तालुक्‍यात ठिकठिकाणी वीज तारांवर झाडाच्या फांद्या, तसेच काही ठिकाणी झाडे कोसळल्‍याने काल (ता.२६) रात्री अकराच्या सुमारास तालुक्‍याचा वीज पुरवठा बंद झाला.
---
आठवडा बाजारावरही परिणाम
आज सकाळपासून वीज तारांवर पडलेली झाडे, फांद्या हटविण्याचे काम महावितरणकडून सुरू करण्यात आले. त्‍यामुळे दुपारी एक वाजल्‍यानंतर संपूर्ण तालुक्‍याचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. दुपारी एक वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्‍याचा मोठा परिणाम कणकवलीच्या आठवडा बाजारावर झाला. दुपारी दोन वाजल्‍यानंतर पावसाचा जोर ओसरला, त्‍यामुळे आठवडा बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Prices : इराण-अमेरिका युद्धाचा थेट फटका! गॅस सिलिंडर महाग; आजपासून नवे दर लागू, किती झाली किंमत?

अग्रलेख : उजेडातील रोषणाई!

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT