कोकण

देवगडमध्ये मॉन्सूनची दमदार सलामी

CD

66579

देवगडमध्ये मॉन्सूनची दमदार सलामी

किनाऱ्याला झोडपले; रेंबवलीत घरावर झाड पडून नुकसान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः तालुक्याच्या किनारी भागांत यंदाच्या मॉन्सूनने दमदार सलामी दिली. सलामीलाच १८० मिलिमीटर इतका पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह जोराच्या झालेल्या पावसाने आज पहाटेच्या सुमारास तालुक्यातील रेंबवली येथील एका घरावर शेवग्याचे झाड पडून सुमारे १० हजारांचे नुकसान झाले. महसूल यंत्रणेने नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान, यंदाच्या हंगामात मॉन्सूनपूर्व पाऊस मिळून आतापर्यंत एकूण ५८८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली.
गेले काही दिवस तालुक्याच्या किनारी भागाला मॉन्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यानंतर मॉन्सूनचे तालुक्यात दमदार आगमन झाले. सोमवारी (ता. २६) सायंकाळसह रात्रीपासून आज सकाळपर्यंत पावसाच्या दमदार सरी बरसल्या. मॉन्सूनने १८० मिलिमीटर इतक्या पावसाची दमदार सलामी दिली. पावसाबरोबरच अधूनमधून सुटणारा वादळी वारा नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. किनारी भागांत अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. आकाशात ढग काळवंडलेले असल्याने केव्हाही जोराचा पाऊस सुरू होईल, अशी शक्यता असते. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील रेंबवली येथील एका घरावर शेवग्याचे झाड पडून सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले. नुकसानीची महसूल यंत्रणेने माहिती घेतली.
---
ग्रामीण भागांतील नद्यांना पूर
सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे देवगड जामसंडे शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होत असतो. मॉन्सूनने तालुक्याचा बहुतांश भाग व्यापला असून, शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

‘बायको पाहिजे’चं पोस्टर सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ; व्हायरल पोस्टर बॉय नेमका कोण ?

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Horoscop : उद्या 6 मार्चला 'या' 6 राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी खुशखबर; आर्थिक लाभ संभवतो, नात्याला मिळेल नवी दिशा

SCROLL FOR NEXT