कोकण

तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा

CD

-rat२७p४.jpg-
२५N६६५२०
गुहागर ः घराची कौले फुटल्यामुळे घराचे नुकसान.
-rat२७p५.jpg -
P२५N६६५२१
गुहागर ः वहाळात साचलेली माती जेसीबीद्वारे बाजूला करण्यात येत आहे.
------
गुहागरला मुसळधार पावसाचा तडाखा
घरे, झाडे कोसळून मोठे नुकसान; अंजनवेलवासीयांना स्थलांतराच्या सूचना, वडद गाव तीन दिवस अंधारात
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २७ : मुसळधार पावसाचा तडाखा गुहागर तालुक्याला बसला असून घरे, बांध आणि उत्पन्न देणारी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूच्या दरडीवरील दगड कोसळल्याने बौद्धवाडीतील घरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. आबलोली व भातगाव येथे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी जेसीबीच्या साह्याने बाजूला केल्या जात आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच धोपावे येथे मुख्य वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे दोन गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भरपावसात कसरत करावी लागत आहे.
गुहागर तालुक्यात गेले आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अडूर येथील अशोक नाना देवळे यांच्या अंगणातील आंब्याचे जुने झाड कोसळले. वेलदूर नवानगर येथील यशवंत जांभारकर यांच्या शौचालयावर दगड व माती आल्याने शौचालयाचे नुकसान झाले. धोपावेत मुख्य वाहिनीवर झाड पडून धोपावे आणि त्रिशूलसाखरी गावाचा वीजपुरवठा बंद झाला होता; परंतु, काहीवेळाने झाड बाजूला केल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्यात आला. कोतळूक किरवलेवाडी येथील गंगाय पांडुरंग भेकरे यांच्या घराची पडवी व छप्पर कोसळले. पालशेत-हेदवी रस्त्यावर पालशेत पाटा वरचीवाडी येथे जंगली झाडांची फांदी पडून रस्ता बंद झाला. तो पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. असगोली खारवीवाडी येथील गायत्री रमेश पालशेतकर यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळली आहे. वडद येथील संजय शशीशेखर सोमण यांच्या घराचे छप्पर कोसळले. कौंढर काळसूर येथे सुकाडवाडी येथील सार्वजनिक विहिरीचे बांधकाम पडले आहे. त्यामध्ये १५ हजारांचे नुकसान झाले. मोहितेवाडीतील प्रभावती गोपाळ मोहिते यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडली. आरे बौद्धवाडी येथील साकव पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. भातगाव तिसंग येथील पार्वती शंकर वेले यांच्या घराशेजारील बांध कोसळला आहे. अंजनवेल बौद्धवाडी येथे रस्त्याच्या बाजूच्या दरडीवरील दगड कोसळल्याने बौद्धवाडीतील घरातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. परचुरी बौद्धवाडीतील विहिरीची संरक्षण भिंत पडून २५ हजारांचे, वरवेली येथील नामदेव रत्नू रावणग यांचे गोठ्याचे नुकसान झाले. भालगाव येथील विजय महादेव मुंडेकर यांच्या बंद घरावर झाड पडले. भातगाव बौद्धविहाराची संरक्षक भिंत कोसळली. तवसाळ-बाबरवाडी येथील सुरेश गोविंद येद्रे यांच्या घरावर झाडाची फांदी पडली. वडद येथील फिडर नादुरूस्त झाल्याने तीन दिवस गाव अंधारात आहे. आरे येथील गुहागर-वेलदूर पुलाला लागून मोठमोठी लाकडे अडकली आहेत. ती मोकळी करणे आवश्यक आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
-----
गटारे बुजल्याने माती रस्त्यावर
मोडकाआगर ते रोहिले या भागात केबल टाकण्यासाठी खोदलेले चर बुजवून झाल्यावर तिथे कुठेही रोलिंग करण्यात आलेले नाही तसेच गटारसुद्धा मोकळे केलेले नाही. याची सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले तसेच नरवण येथील रस्त्याच्या उताराला गटारे बुजल्यामुळे आणि केबलच्या पाईपवरील माती रोलिंग न केल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर दगड, माती रस्त्यावर आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे तसेच संबंधित कंत्राटदाराकडून कामाची पूर्तता करून घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-----
तीन वाड्यांचा पाणीपुरवठा बंद
उमराठ कोंडवीवाडी, डागवाडी आणि धनावडेवाडी येथे गेले दोन दिवस वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. याबाबत उमराठ सरपंच जनार्दन आंबेकर यांनी वीजपुरवठा सुरळीत करतानाच पाणीपुरवठा करा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT