कोकण

कोदवली नदीवर लोकसहभागातून काँक्रिटचा बंधारा

CD

-rat२७p१०.jpg -
P२५N६६५४५
राजापूर ः विहिरीतील पाणीसाठा वाढण्यासाठी बंधारा उपयुक्त ठरणार आहे
------
कोदवली नदीवर लोकसहभागातून काँक्रिटचा बंधारा
मांडवकरवाडीचा आदर्श ; पाणीटंचाईला मिळणार पूर्णविराम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः लोकवर्गणीसह विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून लाखो रुपयांचा निधी उभारून तालुक्यातील कोदवली मांडवकरवाडीतील ग्रामस्थांनी कोदवली नदीवर सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधला आहे. त्यातून, या वाडीला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात भेडसावणारी पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. ग्रामविकास सेवा संस्था, मांडवकरवाडीच्या (रजि.) नेतृत्वाखाली कोदवलीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ‘स्वप्नपूर्ती’ बंधारा बांधला आहे.
कोदवली मांडवकरवाडीलाही एप्रिल-मे महिन्यामध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुमारे १६५ कुटुंबे आणि ५५० लोकवस्ती असलेल्या मांडवकरवाडीला पाणीपुरवठा करण्यासाठी नळपाणी योजना राबवण्यात आलेली आहे. त्यासाठी नदीपात्रालगत विहीर बांधण्यात आलेली आहे; मात्र, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे झाल्याचा प्रतिकूल परिणाम नदीपात्रालगत बांधलेल्या विहिरीतील पाणीसाठा खालावतो. वाडीमध्येही तीन-चार विहिरी असून, त्यामधीलही पाणीसाठ्याची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यामध्ये येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. या बांधकामासाठी लोकवर्गणी गोळा करत निधीची उभारणी केली आहे. त्याला आमदार किरण सामंत यांच्यासह संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, श्री श्री रविशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था, कोदवलीतील अन्य वाड्यांमधील ग्रामस्थ यांसह अन्य विविध सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींचेही पाठबळ मिळाले. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. कौतुक केले जात आहे.
-----------
असा होणार उपयोग
कोदवली नदीपात्रामध्ये सुमारे १७ मीटर लांब, ४.५० ते १ मीटर रूंद आणि फाउंडेशनसह ३ मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. सिमेंट काँक्रिटच्या बंधाऱ्यामुळे त्या भागमध्ये भूजलसाठा वाढण्यासाठी आणि गावाला पाणीपुरवठा करणाऱ्‍या नळपाणी योजनेच्या नदीपात्रालगतच्या मुख्य विहिरीची पाण्याची पातळी वाढण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. गावातील अन्य विहिरींनाही त्याचा फायदा होणार असल्याची माहिती विलास पळसमकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT