कोकण

गणेश गोसावी ठरला सरपंच श्री लोटे चा मानकरी

CD

-rat२७p२०.jpg -
२५N६६६२०
खेड ः सरपंच श्री लोटे २०२५ चा मानकरी ठरलेला गणेश गोसावी. शेजारी उपविजेते.
------
गणेश गोसावीला ‘सरपंच श्री लोटे’
लोटेत स्पर्धा ; केतन चाळके तालुका सरपंच श्री
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २८ : तालुक्यातील लोटे येथे महेश गोवळकर संकुलामधील संतकृपा सभागृहामध्ये जिल्हास्तरीय सरपंच श्री लोटे २०२५ किताबाची शरीरसौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली होती. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे ६०हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये पवार फिटनेस सावर्डेचा गणेश गोसावी हा जिल्हा अजिंक्यपद मिळवून सरपंच श्री लोटे २०२५ ठरला तर ‘खेड तालुका सरपंच श्री’ वेलनेस जिम चिपळूणचा मानकरी केतन चाळके हा ठरला.
खेड तालुक्यात प्रथमच रत्नागिरी जिल्हास्तरावर शरीरसौष्ठव जिल्हास्तरीय स्पर्धा भरवण्यात आली. ‘सरपंच श्री लोटे २०२५’ किताबाची जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने आणि सरपंच चंद्रकांत उर्फ भाई चाळके यांच्या सौजन्याने ही स्पर्धा भरवण्यात आली होती. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे साठहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये ''सरपंच श्री लोटे २०२५''चा जिल्हा अजिंक्यपद विजेता पवार्स फिटनेस सावर्डेचा गणेश गोसावी ठरला, तर ''खेड तालुका सरपंच श्री'' म्हणून केतन चाळके याने नाव कोरले. बेस्ट पोझर म्हणून आरएसपीएम राजापूरचा हर्षद मांडवकर, तर रायझिंग स्टार म्हणून सुयोग पदुमले याला गौरविण्यात आले. सरपंच मेन्स फिटनेसचा मानकरी एसबी फिटनेस चिपळूणचा आकाश वाजे ठरला. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT