कोकण

भात रोपांची लागवड चटई पद्धतीने करा

CD

भात रोपांची लागवड चटई पद्धतीने करा
कृषी विभाग ; एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टरला पुरेशी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ः पावसामुळे लागवडीपूर्वीच बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली. या स्थितीत शेतकऱ्यांना पेरणी करणे कठीण झाले आहे. यावर पर्याय म्हणून कृषी विभागाने भात रोपासाठी चटई पद्धतीची संकल्पना मांडली आहे. या पद्धतीतून १२ ते १५ दिवसात भात रोपे तयार होऊन ती लागवडी योग्य होतात. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषी विभागाने केला आहे.
कृषि विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार चटई पद्धतीमध्ये नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीसाठी पुरेशी आहेत. रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्‍क्‍या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो. या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील. चटई रोपवाटिका शेतकऱ्यांना घराच्या पडवीतही करणे शक्‍य आहे. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीसाठी पुरेशी होतात. रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्क्या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो. रोपवाटिकेसाठी १.२० मी. रुंद व १०० गेजचा प्लॅस्टिकचा कागद वापरतात. एक गुंठा रोपवाटिका तयार करण्यासाठी साधारणपणे २.५ ते ३ किलो कागद लागतो. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लॅस्टिकला छिद्रे पाडावीत. हा प्लॅस्टिक कागद ज्या ठिकाणी रोपवाटिका तयार करावयाची आहे, तिथे पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विटा किंवा बांबूच्या साह्याने उचलून घ्याव्यात. तयार झालेल्या वाफ्यात माती व शेणखत ६०ः४० या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि १ इंच उंची असलेल्या लोखंडी फ्रेममध्ये भरावे. माती व शेणखत मिश्रण फ्रेममध्ये टाकण्यापूर्वी ५ मिमीच्या चाळणीमधून चाळून घ्यावी. त्यामुळे मातीमधील खडे वेगळे होतात. प्लॅस्टिक कागदावर शेणखतमिश्रित माती टाकून झाल्यानंतर झारीने पाणी शिंपडून माती ओली करून घ्यावी. हलकासा दाब द्यावा.
अशा वाफ्यावरती रहू पद्धतीने म्हणजेच २४ तास पाण्यात भिजवून नंतर ३६ ते ४८ तास पोत्यामध्ये बियाणे ठेवून मोड आलेले बियाणे ५०० ग्रॅम प्रति चौ. मी. या दराने फेकून पेरावे. या नंतर चाळलेल्या शेणखतमिश्रित मातीने हलकेसे झाकावे. सुरुवातीला २ ते ४ दिवस हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने पाणी फवारून द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी चटई रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी प्रति चौ.मी.साठी २० ग्रॅम डायअमोनियम फॉस्फेट शेणखत, माती मिश्रणात मिसळून द्यावे. रोपे साधारण १२ ते १५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपांची संख्या जास्त असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही जर झाल्यास हाताने तणे उपटून घ्यावीत. तयार झालेली रोपे रोपवाटिकेतून प्लॅस्टिक रोल करून किंवा हव्या त्या आकारात वाफे कापून मुख्य शेतावर जेथे लावणी करावयाची आहे, अशा ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो. जर लावणी यंत्राच्या साहाय्याने करावयाची झाल्यास ८ इंच रुंदीच्या रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणी यंत्रात वापरता येतात. एक चौरस मीटरवर घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेसे होतात, म्हणजेच एक हेक्‍टर क्षेत्रासाठी एक गुंठा क्षेत्र रोपवाटिकेसाठी पुरेसे आहे, असे कृषि विभागाकडून सांगण्यात आले.

कोट
रहूसाठी ८० ते १०० किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. रहू तयार करताना भात बियाणे गोणपाटात बांधून २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे पाण्यातून बाहेर काढून २४ तास गोणपाटाच्या खाली-वर सुका पेंढा ठेवून त्यावर पाणी मारावे. अशा प्रकारे तयार केलेला आणि नुकताच मोड फुटलेला ४८ तासांचा रहू पेरणीसाठी वापरावा. चिखलणी केलेल्या क्षेत्रावर सुरुवातीची खताची मात्रा दिल्यानंतर रहू शक्‍यतो २२.५ सें.मी. अंतरावर ओळीत पेरावा. ओळीत पेरणे शक्‍य नसेल अशा वेळी रहू फेकून पेरावा.
- मनोज गांधी, मंडळ कृषी अधिकारी, खेर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT