- rat२p८.jpg-
P२५N६७६२३
पकडलेले मासे.
चढणीचे मासे पकडण्यासाठी लगबग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २ ः पावसाच्या सरींना सुरुवात होताच चढणीचे मासे पकडण्यासाठी तरुणांची लगबग सुरू असते. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे नदी, नाले आणि कातळावरही ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. शेतामध्येही पाणी वाहून जात आहे. त्यात आलेले चढणीचे मासे पकडण्यासाठी तरुण सरसावलेले आहेत.
शेती, पाणी आणि खाद्यविषयक अनेक गरजा लीलया भागवणारे सडे पावसाच्या सुरुवातीच्या काळात अक्षरशः माणसांनी भरलेले दिसतात. शेतीची कामे, स्वच्छ पाणी, भारंगी, टाकळा, फोडशी, पायरी सारख्या रानभाज्या मिळवण्यासाठी दिवसा लोकांची सड्यावर झुंबड उडते. रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठीसुद्धा अनेक लोक सड्यावर येतात. या प्रकारच्या पारंपरिक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वर्षानुवर्षे वापरात आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे बांधन पोटात अंडी असणारे मासे संथगतीने पाण्यात अंडी घालण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वरच्या दिशेने प्रवास करतात. त्यांनाच मळ्याचे मासे अशा नावाने ओळखले जाते. रंगाने काळे असणारे, देखणे दिसणारे सरळ नेटक्या बांध्याचे हे मासे खायलादेखील खूप रुचकर लागतात. हे मासे खूप स्वच्छ असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने पकडले जातात. मोठ्या पावसात मात्र बहुतेक सर्व बांधणी वाहून जातात. बांधणात पकडलेले मासे विकत घेण्यासाठी खूप लोकं गर्दी करतात. पहिल्या पावसातील हे मासे खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. सध्या पावसामुळे अनेक तरुणांची मासे पकडण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.