कोकण

''एसटी'' सर्वसामान्यांची जीवनवाहिनी

CD

swt21.jpg
67660
कुडाळः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील बसस्थानकात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. (छायाचित्रः अजय सावंत)

‘एसटी’ सर्वसामान्यांची जीवनवाहिनी
आगार व्यवस्थापक रोहित नाईकः कुडाळात ‘लालपरी’चा वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. तिच्यातून जास्तीत-जास्त प्रवाशांनी प्रवास करून सेवेची संधी द्यावी. एसटी आता ''एआय स्मार्ट'' तंत्रज्ञानात प्रवास करीत आहे. येत्या काळात प्रवाशांना नवनवीन सेवासुविधा मिळणार आहेत. प्रवाशांनी त्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ आगाराचे व्यवस्थापक रोहित नाईक यांनी एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रवाशांना केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच ‘एसटी’ला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील बसस्थानकात वर्धापन दिन फटाके फोडून व केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक नाईक, प्रा. वैभव खानोलकर, वाहतूक निरीक्षक पल्लवी मौर्ये, वाहतूक नियंत्रक महादेव आंबेसकर, रावजी राणे, लिपिक वैभव वंजारे, गणेश कुंभार, लेखाकार विशाल कांबळी, यांत्रिकी संजय पाथरुठ, वरिष्ठ लिपिक तनया सावंत, चालक एस. ए. माळकर, चालक-वाहक आर. पी. चव्हाण, वाहक राजेश मसूरकर, प्रवासीमित्र जयराम डिगसकर, नारायण तळेकर आदी उपस्थित होते.
या वर्धापन दिनानिमित्त बस स्थानकात आकर्षक रांगोळी काढून व फुलांची सजावट करून बसचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक नारायण तळेकर यांच्या हस्ते एसटी बसला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून केक कापण्यात आला. कोकणप्रेमी एसटी ग्रुपच्या वतीने उपस्थितांच्या हस्ते कुडाळ-विजापूर असा नामफलकाचा बोर्ड आगारास भेट देण्यात आला.
पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून १९४८ साली एसटीची पहिली बस धावली होती. त्यानिमित्त दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. गेली ७७ वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व अल्पदरात प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी बस प्रामाणिकपणे करीत आली आहे.
प्रा. खानोलकर म्हणाले, ‘‘सौजन्य हा एसटी महामंडळाचा आत्मा आहे. या सौजन्याच्या माध्यमातून एसटी महामंडळाने प्रवास करीत असताना अनेक प्रवासी व ग्रुप जोडण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी अस्पृश्यता होती, त्यावेळी सर्वांना एकाच धाग्यात बांधून गावोगावी खेडोखेडी जोडण्याचे काम एसटीने केले. एसटी महामंडळाला आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळ ''ना नफा ना तोटा'' या तत्त्वावर चालत आहे. त्यामुळे शासनाने एसटी महामंडळाला टोलमाफीतून मुक्त करावे. टोलमाफीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूक स्वस्त होईल. यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत. एसटी चालली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र चालेल. सामान्य लोकांमध्ये एसटीबद्दलची तळमळ आजही दिसत आहे. भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे महामंडळ हे एसटी महामंडळ आहे, एवढी एसटीची ताकद आहे. ''बहुजन हिताय बहुजन सुखाय''च्या माध्यमातून प्रत्येकाला एसटीचा प्रवास आपला वाटतो. यापुढेही एसटी बसची घोडदौड अशीच सुरू राहावी, या वर्धापन दिनी शुभेच्छा.’’ जयराम डिगसकर, नारायण तळेकर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महादेव आंबेसकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

SCROLL FOR NEXT