ज्येष्ठ नागरिक संघाची
सावंतवाडीत उद्या सभा
सावंतवाडीः येथील तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवारी (ता. ७) सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
''विरण-बेलाचीवाडी
बस पूर्ववत करा''
मसुरेः विरण-बेलाचीवाडी, मुस्लिमवाडी एसटी बस गेली अनेक वर्षे चालू आहे; मात्र यावर्षी विरण-बेलाचीवाडी रस्त्याचे काम सुरू केल्याने एप्रिलपासून गेले दोन महिने या मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे. या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण पूर्ण होऊन १५ दिवस उलटले, तरी अद्याप एसटी वाहतूक सुरू न झाल्याने प्रवासी, विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. मालवण आगार प्रमुख यांनी या समस्येची दखल घेऊन बंद असलेली सकाळची व सायंकाळची कसाल-बेलाचीवाडी एसटी बस वाहतूक पूर्ववत सुरू करावी, अशी जनतेची मागणी आहे.
...................
कुडाळमध्ये पावसाने
कणकीचे बेट कोसळले
कुडाळः शहरातील क्षितिज अपार्टमेंट समोरील रस्त्यावर तेथील कणकीचे बेट बुधवारी (ता. ४) सकाळी वाऱ्याने कोसळले. त्यामुळे तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर आलेले बेट हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. काळपनाका ते गांधी चौक या रस्ता दरम्यान तेथील पुलाला लागूनच कणकीचे मोठे बेट आहे. हे बेट सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात तेथील रस्त्यावर कोसळले. जवळपास अर्ध्या रस्त्यावर हे बेट कलंडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याबाबतची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने धाव घेत रस्त्यावरील बेट हटविण्याचे काम हाती घेतले.
.....................
हेवाळे-मुळस मार्गावर
जुनाट वृक्ष कोसळला
दोडामार्ग, ता. ५ ः हेवाळे ते मुळस मार्गावर बुधवारी (ता. ४) दुपारी एक प्राचीन, शेकडो वर्षांपूर्वीचा वृक्ष अचानक कोसळला. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मुख्य रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे हाल झाले. हेवाळे ते मुळस या रस्त्यालगत शेकडो वर्षांपूर्वीचा एक जुनाट वृक्ष होता. तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. स्थानिकांच्या माहितीनुसार झाडाच्या मुळाजवळील जमीन गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे भुसभुशीत झाली होती. त्यातच जोरदार वाऱ्यामुळे हे भले मोठे झाड सरळ रस्त्यावर कोसळले. सुदैवाने जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही; मात्र दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. कामावर जाणारे ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. स्थानिकांनी जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला करण्याचा प्रयत्न केला. झाड अतिशय मोठे असल्याने त्याच्या फांद्या तोडून वेगवेगळ्या भागांमध्ये कापून हटवावे लागले.
......................
उपकार्यकारी अभियंता
विलास बगडेंची बदली
कणकवली, ता. ५ ः येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांची कल्याण झोनमध्ये बदली झाली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर झोनमधून संदीप पाटील यांना कणकवली येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. बगडे यांनी कणकवली येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून सुमारे साडेतीन वर्षे काम केले.
......................
नेरुर येथे उद्या
''कलियुग'' नाटक
कुडाळ, ता. ५ ः नेरुर श्री देव कलेश्वर मंदिर येथे शनिवारी (ता. ७) सायंकाळी ७.३० वाजता कलेश्वर भक्तमंडळाच्या वतीने
''कलियुग'' नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सत्यनारायण महापूजा व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव कलेश्वर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.