- rat६p११.jpg-
२५N६८४९३
सागर मोरे
आरोग्यसेवक परीक्षेत
सागर मोरे अव्वल
लांजा, ता. ६ ः लांजा तालुक्यातील कोलेवाडी येथील सागर मोरे याने जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक (वर्ग ३) परीक्षेत २०० पैकी १७२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
सागर याचे बारावीपर्यंतचे शिक्षण हे लांजा हायस्कूलमध्ये झाले. पहिलीपासून ते बारावीपर्यंत त्याने वर्गात पहिला क्रमांक सोडलेला नाही. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सागरला स्पर्धा परीक्षेची आवड असल्यामुळे घरीच राहून दोन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. गेल्या वर्षी झालेल्या आरोग्यसेवक सरळसेवा परीक्षेत तीन वेगवेगळे पेपर देत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. यापूर्वी झालेल्या सिंधुदुर्गमधील दंत सहाय्यकच्या सरळसेवा परीक्षेत सागर १५व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. आई-वडिलांच्या पाठबळामुळे आपण हे यश मिळवू शकलो, असे सागरने सांगितले तसेच प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यास आज ना उद्या यश हमखास मिळते, असेही त्याने सांगितले. वर्षभरात तीन जिल्ह्यात सरळसेवेच्या चार पोस्ट काढल्याबद्दल सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.