कोकण

सामाजिक सलोखा कायम रहावा

CD

- rat६p१२.jpg -
२५N६८४९५
मंडणगड ः पोलिस ठाणे येथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
---
सामाजिक सलोखा कायम ठेवा
नितीन बगाटे ः मंडणगडमध्ये नागरिकांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः समाजात सलोखा राहावा यासाठी सर्वांनी आग्रही असले पाहिजे. जिल्ह्यात दौरा करताना जिल्ह्यात सामाजिक सलोख्याचे वातावरण आहे. ते अधिक वृद्धिंगत व्हावे, या हेतूने प्रत्येक तालुकास्तरावर सामाजिक सलोखा समितीची निर्मिती केली आहे. पोलिस प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी कार्यरत राहील, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले.
बगाटे यांनी मंडणगड येथे नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी प्रथम उपस्थित नागरिकांकडून तालुक्यातील समस्या, प्रश्न व सूचना जाणून घेतल्या. त्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी या वेळी पोलिस अधिकाऱ्यांना आदेशही केले. यानंतर त्यांनी उपस्थितांशी मनमोकळेपणाने संवाद साधला, यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था, पोलिस प्रशासन व नागरिकांची जबाबदारी यावर भाष्य केले. संवादसभेनंतर जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत पोलिस अधीक्षक बगाटे यांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलिस निरीक्षक नितीन गवारे व विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinchpokli Chintamani : ‘आगमनाधीश’… चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृती

'RSS म्हणजे भारतीय तालिबान, त्यांच्याकडून देशात शांतता बिघडवण्याचं काम..'; मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस नेत्याची सडकून टीका

अभिनयानेच दिलं जगण्याचं बळ ! पडत्या काळात एकटीने तारला संसार , ज्योती चांदेकर यांची प्रेरणादायी कारकीर्द

Chandu Borde: चंदू बोर्डे नाबाद 90

Latest Marathi News Updates : काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT