
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि मुंबईसह उपनगरात गणेश आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या भव्य मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधले आहे. परळ वर्कशॉपमधून या मूर्तीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले, आणि हजारो भाविकांनी बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी गर्दी केली. 22 फुट उंचीच्या या मूर्तीने सर्वांचे मन मोहून टाकले आहे.