अकोट : तालुक्यातील ग्राम आंबोडा येथे रविवारी (दि. १७) दुपारी भींत कोसळून तीन वर्षीय शर्वी प्रवीण शिरसाट हिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
शर्वी ही दुपारी दोनच्या सुमारास घरात खेळत असताना अचानक भींत तिच्यावर कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने बाहेर काढून अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
घटनास्थळी अकोट पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर जुनघरे, तसेच बिट अंमलदार ठोसरे आणि देउळकर यांनी भेट दिली.