swt63.jpg
68525
सावंतवाडीः दृष्टी बांधवांचा स्नेहमेळाव्याचे दीपप्रज्वलन उद्घाटन करताना नंदकुमार प्रभू देसाई.
दृष्टी बाधितांनी सकारात्मक रहावे
नंदकुमार प्रभू देसाईः सावंतवाडीत ‘नॅब’तर्फे स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः दृष्टी बाधितांनी आपले विचार सकारात्मक ठेवावे, नवनवीन कौशल्य आत्मसात करावी, आपल्या न्याय हक्कासाठी भांडावे तसेच आपले कर्तव्य विसरू नये. कष्टाला प्राधान्य देतानाच जगण्याचे कौशल्य जाणून घेऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखाधिकारी नंदकुमार प्रभू देसाई यांनी केले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सिंधुदुर्ग सावंतवाडी यांच्यातर्फे नॅब नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात हेलन केलर यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्ह्यातील दृष्टी बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. प्रभू देसाई यांनी उपस्थित दृष्टि बाधितांना मार्गदर्शन केले. यावेळी नेटचे अध्यक्ष अनंत उजगावकर, खजिनदार विनया बाड, डॉ. सुहास नायडू, सुहास सातोसकर, प्रवीण परब, डॉ. स्नेहल गोवेकर, रामदास पारकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘दृष्टीबाधित व्यक्तींनी नव-नवीन गोष्टींची माहिती करून घ्यावी, ब्रेल लिपी समजून घ्यावी, समाज तुमच्याबरोबर आहे याची खात्री बाळगावी, न्याय हक्क मिळवावा, कर्तव्य विसरू नका, कष्टाला प्राधान्य द्यावे. दृष्टीबाधित व्यक्तींना जगण्याचे कौशल्य जाणून घेऊन आपल्या प्रगती साधण्यासाठी शिक्षण व्यवसायाला महत्त्व द्यावे. कष्टातून तुमचे कठीण वळण बदलेल याची खात्री बाळगा. सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारा समाज तुमच्याबरोबर कायम असणार याची खात्री बाळगा. नॅब संस्था तुमच्यासाठी सर्वोत्तमरीत्या कार्य करत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.