कोकण

कुडाळातील खंडीत वीज समस्या मार्गी लावा

CD

swt65.jpg
68527
कुडाळः तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठाप्रश्नी ह्युमन राईट संघटनेच्यावतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.


कुडाळातील खंडीत वीज समस्या मार्गी लावा
ह्युमन राईट संघटनाः विज वितरणला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, अशी मागणी जिल्हा अधीक्षक अभियंता राख यांच्याकडे ह्युमन राईट संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. मागील आठवड्यापासून अनेक गावातील वीजपुरवठा पूर्णतः बंद आहे. ज्यामुळे विविध व्यवहारही ठप्प झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हाभरात पूर्णपणे बोजवारा झालेला आहे. यामुळे अतिशय गंभीर परिस्थितीचे भान राखत तात्काळ जिल्ह्यातील अनियमित व पूर्णतः बंद असलेला वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग या संस्थेने महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता राख यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख रूपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, सदस्या सिध्दी पारकर, दर्शना राणे आदी उपस्थित होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने दिलेल्या निवेदनाची महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेऊन त्वरित सुधारणात्मक उपाययोजना करण्यात यावी. तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी  विनंती केली आहे. या निवेदनाची प्रत आमदार निलेश राणे तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनाही पाठविली आहे, असे जिल्हाध्यक्ष धुरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT