कोकण

भाजपतर्फे आज गेळेत वृक्षारोपण

CD

भाजपतर्फे आज
गेळेत वृक्षारोपण
सावंतवाडी ः राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येणाऱ्या भाजपच्या पर्यावरण दिना निमित्ताने ‘एक झाड मातृभूमीसाठी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदीप गावडे यांच्या आयोजनातून उद्या (ता. ८) ‘फ्लॉवर व्हॅली अॅट कावळेसाद पॉईंट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत गेळे कावळेसाद पॉईंट तसेच तेथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १०० झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. या कार्यक्रमास पर्यावरणप्रेमींसह सामाजिक कार्यकर्ते व भाजप कार्यकर्ते तसेच आंबोली, गेळे, चौकुळ येथील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. गावडे यांनी केले आहे.
.................
तेंडोली येथे आज
‘भानुमती स्वयंवर’
कुडाळ ः तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी कला, क्रीडा मंडळातर्फे उद्या (ता. ८) सायंकाळी ७.३० वाजता तेथीलच श्री अनलादेवी मंदिरात जिल्ह्यातील निवडक दशावतार कलाकारांचा ‘भानुमती स्वयंवर’ या संयुक्त दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकामध्ये गणपती-नाना प्रभू, रिद्धी सिद्धी-चैतन्य राऊळ, भीष्म-संजय वालावलकर, दुर्योधन-साईप्रसाद तवटे, कर्ण-गिरीश राऊळ, शल्य-साहिल तळकटकर, अर्जुन-विलास तेंडोलकर, राजा-आनंद नार्वेकर, शकुनी-सुनील खोर्जेकर, भानुमती-यश जळवी, सुप्रिया-सिद्धेश मुणनकर, नवरा-पिंट्या दळवी आदी कलाकार सहभाग घेणार आहेत. संगीत साथ हार्मोनियम-अमोल मोचेमाडकर, पखावज-अर्जुन सावंत, झांज-विनायक राऊळ यांची आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
...................
सावंतवाडीत बुधवारी
‘कोमसाप’ची सभा
सावंतवाडी ः कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता सावंतवाडी जिमखाना मैदानाजवळील बॅडमिंटन हॉल इमारतीत आयोजित केली आहे. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा केली जाणार आहे. या सभेला जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के व केंद्रीय कार्यकारिणी सदस्या उषा परब, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अ‍ॅड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर यांनी केले आहे.
.....................
डॉन बॉस्को स्कूलमध्ये
सायकल दिन उत्साहात
ओरोस ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोसच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सायकल चालवून पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देऊन आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून दिले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. ३) ओरोस येथे झालेल्या या कार्यक्रमाला डॉन बॉस्कोचे मुख्याध्यापक फादर मेल्विन उपस्थित होते. यामध्ये प्रशालेच्या १३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
.....................
पर्यटन व्यावसायिकांची
मालवणात १० ला सभा
मालवण ः सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने सिंधुदुर्गाच्या पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि पर्यटन व्यावसायिकांची खुली सभा मंगळवारी (ता. १०) सायंकाळी ४ वाजता मालवण- धुरीवाडा येथील संस्कार सभागृहात आयोजित केली आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT