-rat९p११ ः
२५N६९३२३
राजापूर ः मित्र शैलेश जैतापकर यांच्यासह हेमंतकुमार सावंत.
-rat९p१२ ः
२५N६९३२४
भुईमुगाच्या शेंगा.
-rat९p१३ ः
P२५N६९३२५
सोलर कनेक्शन
-----------
शुक नदीकाठी पडीक दीड एकरवर पिकवला सेंद्रिय भुईमूग
हेमंतकुमार सावंत ः नोकरी अन् शेतीचा उत्तम मेळ, मित्र शैलेश जैतापकरची मदत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळ येथील हेमंतकुमार सावंत यांनी वाल्ये येथील शेतकरी मित्र शैलेश जैतापकर यांच्या साथीने शुक नदीकाठी पडीक जमीन ओलिताखाली आणली आहे. तेथे सुमारे दीड एकर क्षेत्रामध्ये भुईमुगाची सेंद्रिय शेती केली. त्यामधून सुमारे ९०० किलो शेंगा त्यांना पहिल्याच हंगामात मिळाल्या आहेत. विविध कारणांमुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र गावोगावी असतानाच राजापूर पंचायत समितीत कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अधीक्षक) म्हणून कार्यरत असलेल्या सावंत यांनी मित्र शैलेश जैतापकर यांच्या साथीने नोकरी आणि शेती यांचा सुरेख संगम साधला आहे.
तालुक्यातील प्रिंदावण, वाल्ये आदी परिसरातून वाहणाऱ्या शुक नदीच्या काठावरील जमिनीमध्ये पावसाळ्यात अनेक शेतकरी भातशेती करतात; मात्र, उन्हाळ्यामध्ये कोणतेही पीक घेतले जात नसल्याने नदीकाठची ही जमीन पडीक असते. वर्षानुवर्षे या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. सध्या खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यात माकड, वानरांसह जंगली जनावरांच्या त्रासामुळे भर पडली आहे. या परिस्थितीमध्ये शेतीची लहानपणापासून आवड असलेले सावंत यांनी जैतापकर यांच्या साथीने शुक नदीच्या काठावरील पडीक जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्धार केला. त्यांनी यंदा उन्हाळी हंगामामध्ये सुमारे दीड एकर क्षेत्रामध्ये भुईमूग लागवड केली. पॉवरटिलरच्या साह्याने जमिनीची नांगरणी केल्यानंतर त्यात सरी पद्धतीने भुईमुगाची लागवड केली. रोपांची चांगली वाढ होणे वा त्यांना पोषक मुल्य मिळावीत म्हणून रासायनिक खतांचा उपयोग करण्याऐवजी त्यांनी शेणखताचा जादा वापर केला. ठिबक सिंचनाद्वारे शेतातील विहिरीचे आवश्यकतेप्रमाणे सोलर पंपाच्या साह्याने शेतीला पाणी दिले. पर्यावरणातील झालेल्या बदलांचा भुईमूग लागवडीवर प्रतिकूल परिणाम होऊन फारसा कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला नसला तरीही एकदा औषध फवारणी केल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीला घातलेल्या तारांच्या कुंपणामुळे मोकाट गुरे, गवा यांसह अन्य रानटी जनावरांकडून शेतीची नासधूस झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. जैतापकर आणि ते मिळणाऱ्या वेळेनुसार कामांचे विभाजन करतात. भुईमुगाच्या शेंगातून तेल काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
------
कोट
वाल्ये येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात शेती केली आहे. लहानपणापासून शेतीची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जैतापकर यांचा अनुभव, आईचे मार्गदर्शन, पत्नीची चांगली साथ मिळत आहे. शेतीतून किती आर्थिक उत्पन्न मिळणार यापेक्षा शेतात राबताना आणि त्यानंतर हिरवेगार झालेले शेतशिवार पाहताना मिळणारा आनंद अवर्णनीय आहे.
- हेमंतकुमार सावंत, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.