कोकण

समाजाचे ऋण कधीही विसरणार नाही

CD

69316

समाजाचे ऋण कधीही विसरणार नाही

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ; तळेरेत ‘गप्पा-टप्पा’ संवाद कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ९ : रीलच्या झगमगाटात आणि चकचकीत दुनियेत नैतिकतेपासून दूर जात असलेल्या तरुण पिढीला सामाजिक जाणीवेची नवी दिशा देणारा, अंतर्मुख करणारा आणि मूल्यांची बीजे रोवणारा ‘गप्पा-टप्पा’ हा विशेष संवाद कार्यक्रम श्रावणी कम्प्युटर्स तळेरे येथे पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी ‘समाजाचे माझ्यावर ऋण आहेत, ते मी कधीच विसरणार नाही’ अशी समर्पणाची शपथ घेतली.
या कार्यक्रमात संविता आश्रमचे ज्येष्ठ समाजसेवक संदीप परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात गुलाब पुष्पाचे रोप देऊन संदीप परब आणि सोबत आलेल्या साक्षी आडे (यवतमाळ), अनिकेत गजबे (अमरावती) आणि मुजहेल या उत्तर प्रदेश येथून आलेल्या एमएसडब्ल्यू इंटर्नशिपच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आली.
श्री. परब यांचे मार्गदर्शन हे प्रभावी प्रेझेंटेशन स्लाईड शोच्या माध्यमातून सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांवर अधिक ठसा उमटला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर परिणाम केला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी मनापासून प्रतिक्रिया देताना, ‘आमची दुःखे काहीच नाहीत, जेव्हा अशी खरी दुःखे समोर येतात, तेव्हा आमचे दुःख फारच लहान वाटू लागते’ अशी भावना व्यक्त केली. आम्ही यापुढे आमच्या परीने समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करू. आमच्या अर्थार्जनातील काही भाग गरजूंसाठी देण्याचा निर्धार करतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व विद्यार्थ्यांनी, ‘समाजाचे माझ्यावर ऋण आहेत, ते मी कधीच विसरणार नाही’ अशी शपथ घेतली. हा संवाद विद्यार्थ्यांसाठी एक जीवनदृष्टी देणारा, मूल्यांची बीजे रुजवणारा अनुभव ठरला. या कार्यक्रमात सुमारे ९० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रावणी कम्प्युटर्सचे संचालक सतीश मदभावे यांनी केली. श्रावणी मदभावे यांनी आभार मानले.
....................
श्रावणी कॉम्प्युटर्सचे कार्य कौतुकास्पद
श्रावणी कॉम्प्युटर्स हे केवळ संगणक प्रशिक्षण देणारे केंद्र न राहता, गेली बारा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत अविरत कार्य करत आहे. विशेषतः श्रावणी मदभावे या डॉ. अनिल नेरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी सतत कार्यरत आहेत, असे गौरवोद्गार यावेळी संदीप परब यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT