-rat१०p२८.jpg -
२५N६९७०२
संगमेश्वर ः कुंभारखाणी येथे वडाच्या झाडाची लागवड करताना महिला.
----
वडाच्या झाडाची लागवड करत वटपौर्णिमा
कुंभारखाणीत उपक्रम ; कुंडीत रोपे तयार करून जोपासनेचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १० ः कुंभारखाणी बु. तालुका संगमेश्वर येथे वडाची फांदी न तोडता वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात झाली. या वेळी सत्यवान सावित्रीसह आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. छोट्यांनीही संस्काराचा भाग म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतला.
विविध रंगाच्या साड्या, पारंपरिक पेहराव घालून महिला भगिनींनी वटवृक्षाची फांदी न तोडता गावाच्या मध्यवर्ती ग्रामपंचायतीशेजारी असलेल्या सुमारे तीनशे वर्षाच्या वटवृक्षाचे पूजन, सूत्रवेष्टन केले. तद्नंतर तयार रोपांचे पूजन व रोपण करून वटसावित्री सण पर्यावरणपूरक, उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला. विकास सुर्वे यांनी वड, पिंपळ, उंबर आदी प्रादेशिक वृक्षांबाबत शास्त्रीय व धार्मिक महत्त्व उपस्थित समुदायांस करून प्रबोधन केले. सीडबॉल चित्रपट निर्माते ज्योती बेडेकर आणि अखिल देसाई यांनी ग्रामीण भागातील सीडबॉल व पर्यावरणाबाबत एवढे सहकार्य मिळाल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
यापूर्वी पर्यावरणपूरक अखिल देसाई आणि ज्योती बेडेकर निर्मित सीडबॉल चित्रपटाचे चित्रीकरण कुंभारखाणी बु. गावात झाले होते. त्याचाच श्रीगणेशा म्हणून वडाच्या झाडांचे वितरण निर्मात्यांमार्फत करण्यात आले. सोबत चिंच, आवळा, गुलमोहर यांच्या बियाही वाटप करण्यात आल्या. प्रत्येकाने आपापल्या घरी कुंडीत रोपे तयार करून त्यांची जोपासना करण्याचा निर्धार कार्यक्रमात बोलून दाखवला. प्रत्येक उपस्थितांना एकेक वडाचे झाड देऊन रोपण व संगोपन करण्याची जबाबदारी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.