कोकण

कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई

CD

kan112.jpg
69799
कणकवलीः शहरातील महापुरूष कॉम्प्लेक्स येथे कचरा टाकण्यात आला होता.

कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई
कणकवली नगरपंचायतीचा इशाराः दुकानदारावर पाचशे रूपये दंडात्‍मक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.११ ः कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाणार असल्‍याचा इशारा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे. दरम्‍यान बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्‍स येथे कचरा टाकल्‍या प्रकरणी शहरातील एका व्यापाऱ्यावर पाचशे रूपये दंडात्‍मक कारवाई करण्यात आली.
कणकवली शहरात नगरपंचायतीच्यावतीने सकाळच्या सत्रात तसेच रात्री कचरा उचलला जातो. मात्र नगरपंचायतीचीकडून कचरा उचलण्यात आल्‍यानंतर काही नागरिक, व्यापारी पुन्हा उघड्यावर कचरा टाकतात. याबाबत गेल्‍या आठवड्यात नगरपंचायतीकडून व्यापारी, नागरिक यांना सूचित केले होते. तरीही बाजारपेठेत कचरा टाकण्यात आल्‍याची घटना घडली. महापुरूष कॉम्प्लेक्‍स येथील रस्त्यावर हा कचरा टाकण्यात आला होता. तेथीलच एका दुकान व्यावसायिकाने हा कचरा टाकल्‍याचे निष्पन्न झाल्‍यानंतर त्‍या दुकानदारावर नगरपंचायतीच्या पथकाने पाचशे रूपये दंडाची कारवाई केली.
दरम्‍यान शहरातील उड्डाणपुलाखालीही भाजी विक्रेत्‍यांकडून कचरा टाकला जातो. याबाबत सर्व भाजी विक्रेत्‍यांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात प्रत्‍येक भाजी, फळ व इतर वस्तू विक्रेत्‍यांना नगरपंचायतीकडून उघड्यावर कचरा न टाकण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. या सूचनांचे उल्‍लंघन करून कचरा टाकण्यात आला. तर या विक्रेत्‍यांवरही दंडात्मक कारवाईचा इशारा आज नगरपंचायत पथकाकडून देण्यात आला.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाचे मुकादम प्रकाश राठोड व सफाई कर्मचारी तुषार कांबळे यांच्या पथकाने आज शहरातील व्यापारी, विक्रेते यांना उघड्यावर कचरा न टाकण्याबाबत सूचना दिल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

Nanded : मध्यरात्री काळाचा घाला, गाढ झोपेतच घराची भिंत कोसळली; दाम्पत्याचा जागीच मृत्यू

RCB च्या स्टार Jacob Bethell इतिहास रचणार, १३६ वर्षांत जे घडलं नव्हतं ते घडणार! इंग्लंडची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : वरळी नाक्यावर परळी दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती

HDFC Bank: HDFC बँकेने रोख व्यवहारांपासून ते चेकबुकपर्यंतचे नियम बदलले; ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT