कोकण

''कोमसाप'' चळवळ अधिक व्यापक करू

CD

swt1110.jpg
69883
सावंतवाडीः कोमसाप तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष मंगेश मसके. बाजूला राजू तावडे, ॲड. संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, डॉ. दीपक तुपकर, विनायक गांवस, ॲड. नकुल पार्सेकर आदी.

‘कोमसाप’ चळवळ अधिक व्यापक करू
दीपक पटेकरः सावंतवाडी शाखा नूतन कार्यकारिणीची निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः साहित्यिकांची भूमी असलेल्या या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल, यासाठी येणाऱ्या काळात काम करण्याबरोबरच नवसाहित्यिकांना व्यासपीठ देऊ. तसेच ‘कोमसाप’चे सुरू असलेले कार्य अधिक जोमाने पुढे नेऊन मधुभाईंना अपेक्षित काम माझ्या माध्यमातून होईल, असा विश्वास सावंतवाडी कोमसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर यांनी आज येथे व्यक्त केला.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून ॲड. संतोष सावंत यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे आज निवडणूक निरीक्षक तशा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या प्रमुख उपस्थितीत तर तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्ष डॉ. दीपक तुपकर तर सहसचिवपदी विनायक गांवस यांची निवड जाहीर करण्यात आली. ॲड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक-जोशी, मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मसके यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
सभेच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद, ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर तसेच कोमसाप परिवारातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिभा चव्हाण यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. डॉ. दीपक तुपकर यांनी नफा-तोटा अंदाजपत्रक सादर करत वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. ॲड. सावंत यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला.
यावेळी केंद्रीय सदस्या उषा परब, तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. गणपत शिरोडकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, एस. एन. मुकन्नावर, अभय नेवगी, दीनानाथ नाईक, प्रा. रुपेश पाटील, दत्ताराम सडेकर, वाय. पी. नाईक, मृणालिनी कशाळीकर, सुहासिनी सडेकर, मंगल नाईक जोशी, डॉ. सोनल लेले, किशोर वालावलकर, संजीव मोहिते, प्रा. डॉ. गणेश मर्गज, एकनाथ कांबळे, रामदास पारकर, संतोष पवार, रितेश राऊळ आदी उपस्थित होते. आभार प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Kabutarkhana: कबुतरखाना हटवण्याच्या कारवाईला स्थानिकांचा विरोध, पालिकेची माघार

IND vs ENG 5th Test: यशस्वी जैस्वालचे फ्लाईंग किस, हार्ट साईन कुणासाठी? समोर आली ती व्यक्ती, सर्वांना वाटलं तो रोहित, पण... Video

इच्छेविरुद्ध पतीने घेतला घटस्फोट मग कॅन्सरपुढे तीही हरली; मृत्यूनंतर नवऱ्याने केले तिच्याच घरच्यांवर आरोप

Scheme: आनंदाची बातमी! महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार, नवीन महत्त्वकांशी योजनेला सुरूवात, अर्ज कसा करायचा?

Elephant Vantara Letter : मी, मी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पुढाकार ठरला बिनकामाचा..., वनताराने प्रसिद्ध केलं पत्र; म्हणाले...

SCROLL FOR NEXT