- ratchl११११.jpg ः
२५N६९९०६
चिपळूण ः वृक्षारोपण करताना विद्यार्थी व मान्यवर.
...तरच भावी पिढीस चांगले
वातावरण मिळेल ः काळे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः तुमच्या भविष्यातील पिढीला चांगले वातावरण द्यायचे असेल तर तुम्ही आजपासून प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य मिलिंद काळे यांनी केले.
लोटे येथील नर्सिंग महाविद्यालयात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी संस्कार भारती उत्तर रत्नागिरी विभागचे महामंत्री मंगेश बापट हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन रोट्रॅक्ट क्लब ऑफ एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची कशी हानी झाली, यावर आधारित एक व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. साक्षी जाधव हिने कविता वाचन केले. रोटरी क्लब ऑफ लोटेचे अध्यक्ष शशांक रेडीज यांनी पर्यावरण संरक्षणाची सुरुवात स्वतःपासूनच कशी करावी या विषयी माहिती दिली. डॉ. सचिन उत्पात यांनी भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचे जतन कशा पद्धतीने केले जाते व त्याची सांगड सणांशी कशी घातली गेली आहे याबद्दल सांगितले. बापट यांनी प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि ते टाळण्यासाठीचे उपाय यावर मार्गदर्शन केले. घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे यांनी प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गावपातळीवर आपण करत असलेले प्रयत्न सांगितले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता केली. या वेळी शुभम काते, तुषार खताते, अनिकेत काते आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.