कोकण

रत्नदुर्गाच्या टेहळणी बुरूज परिसरात अतिक्रमण

CD

-rat१२p२३.jpg-
25N70118
रत्नागिरी- रत्नदुर्ग किल्ल्याच्या टेहळणी बुरुजाभोवती झालेली अनधिकृत बांधकामे.

-rat१२p२५.jpg-
P25N70120
बुरूज ढासळून झालेली दुरवस्था.
------------

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण
जिल्हाधिकारी, बंदर विभागाकडे तक्रार ; अनधिकृत बांधकामे हटवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध समस्येच्या गर्तेत अडकला आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. हे अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी सुमारे चारशे ते पाचशे स्वाक्षऱ्या असलेले निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह बंदर विभाग, परिषदेकडे तक्रारी केल्या आहेत. ऐतिहासिक ठेव्याला बाधा निर्माण करण्याचे काम काहींनी केले आहे. बुरूज ढासळला असून त्याची दुरवस्था झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समुद्रातून जहाजाद्वारे होणाऱ्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा रत्नदुर्ग किल्ल्यावर हा टेहळणी बुरूज बांधण्यात आला होता. समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्रातच टेहळणी बुरूज बांधण्यात आला होता. या बुरुजाच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तक्रारी केल्या आहेत; परंतु यावर अजूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच गेल्याने पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. अनधिकृत बांधकामांमुळे शिवकालीन ठेवा असणाऱ्‍या पावित्र्यास धोका पोहतच आहे. बुरुजावर येण्या-जाण्यासाठी असलेल्या शिवकालीन मार्गासह आजूबाजूला झालेले अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चौकट
वास्तूच्या सौंदर्य, पावित्र्याला बाधा
शिवकालीन वास्तूच्या सौंदर्यास व पावित्र्यास बाधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. तसेच या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी व हा सांस्कृतिक वारसा सुस्थितीत ठेवण्यासाठी किल्ल्यावरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ हटवण्यात यावीत आणि पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT