कोकण

कशेडी घाटातील जुन्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका

CD

‘कशेडी’तील जुन्या मार्गावर
दरडी कोसळण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी दोन्ही बोगद्यातून पूर्णक्षमतेने वाहतूक खुली झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. कशेडी घाटातील जुन्या मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मार्गावर पडलेल्या भेगांमुळे दरडी कोसळण्याचा धोकाही कायम आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता रामभरोसे आहे. कशेडी घाटातून फारशी वाहने फिरवली जात नसली तरी काही वाहने व स्थानिक ग्रामस्थ अजूनही जुन्या घाटमार्गाचाच अवलंबून इच्छित स्थळ गाठत आहेत. या घाटातील जुन्या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. पोलादपूर हद्दीतील भोगावनजीक घाटरस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी मार्ग खचला असून, मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास मार्ग आणखी खचून वाहतूक बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकीकडे घाटातील मार्गाची दैना उडालेली असतानाच दुसरीकडे मात्र घाटरस्त्याच्या दुरुस्तीकडे खात्याने केलेल्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरांतील अनेक भागांत आज पाणीपुरवठा विस्कळीत; 'या' भागांना मोठा फटका

Dharashiv Accident: देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा मृत्यू; चालकाचे नियंत्रण सुटून पारगावजवळ अपघात,दोघे जखमी, दोन्ही मृत

Arey Ware Beach Drowning : खवळलेल्या समुद्रात पोहणं जिवावर बेतलं, आरे वारे बीचवर चौघांचा बुडून मृत्यू; पती-पत्नीसह दोन बहिणींचा समावेश

Nanded News: शिपायाच्या नोकरीसाठी लेकीची विक्री; तिसऱ्या अपत्याची अडचण नको म्हणून पित्याचे कृत्य, आईकडून आठ वर्षांनंतर तक्रार

Madha Crime : धक्कादायक! दहा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; चाकू, दगडाने ठेचून खून, नरबळीचा संशय?

SCROLL FOR NEXT