Mumbai Rain Update
esakal
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज मुंबईत गणेश विसर्जनाची (Ganesh Visarjan Mumbai 2025) धूम पहायला मिळणार आहे. तब्बल ६,५०० सार्वजनिक मंडळे आणि दीड लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील. विसर्जन मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गर्दी नियंत्रणासाठी १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.