rat13p7.jpg
70315
चिपळूण : पिंपळी येथील कोयना अवजलमध्ये पांढरा तवंग आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कोयनेच्या अवजलावर पांढरा तवंग
गाणे - खडपोली एमआयडीसीतील कंपनीने सांडपाणी सोडल्याचा संशय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ः पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलच्या पाण्यावर गुरूवारी ( ता. १२ ) सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाणे-खडपोली एमआयडीसीतील कंपनीने सांडपाणी या अवजलमध्ये सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे; मात्र हे पाणी नक्की कोणत्या कंपनीने सोडले, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
सोशल मीडियावर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पाणी नक्की कोणी सोडले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. काहींनी पिंपळी येथे दूरध्वनी करून माहिती घेतली. पिंपळी येथे आज सायंकाळी पाण्यावर पांढरा तवंग आल्यानंतर चिपळूण पालिकेच्या पाणी विभागानेही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे अवजल पाणी वाशिष्टी नदीला मिळते. चिपळूणमध्ये हे पाणी पालिका उचलते आणि नागरिकांना पिण्यासाठी देते. आज सायंकाळी आठ वाजता पालिका पाणी उचलणार होते. तत्पूर्वी ही घटना समजल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पालिकेने अवजलचे पाणी न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी आहे. ते नागरिकांना दिले जाणार आहे त्यामुळे नागरिकांना भीतीचे कारण नाही; मात्र हा प्रकार मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.
याबाबत माहिती देताना पालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख रोहित खाडे म्हणाले, आम्ही हे दूषित पाणी उचलणार नाही. यापूर्वी असा प्रकार घडला होता त्यानंतर आम्ही सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहोत. वाशिष्टीचे पाणी उचलण्यापूर्वी आम्ही जॅकवेलच्या ठिकाणची छायाचित्रे कर्मचाऱ्यांकडून मागवतो. त्यानंतरच पाणी उचलतो. यापूर्वी असा प्रकार घडला होता तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलिस ठाणे यांना पत्रव्यवहार करून अशाप्रकारे पाणी सोडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना केली होती. कारखानदारांशीही पत्रव्यवहार केला होता. आजचा प्रकार गंभीर आहे. आम्ही आमच्या स्तरावर उपाययोजना करत आहोत. हे पाणी अरबी समुद्राला वाहून गेल्यानंतरच वाशिष्टीचे पाणी उचलले जाईल, असे खाडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.