rat१३p१७.jpg -
२५N७०३६७
सावर्डे: सरपंच संदीप जाबरे यांचे स्वागत करताना कृषिदूत विनायक सावंत, प्रसाद पंडित, साहिल जमदाडे, श्रेयस जमदाडे आदी.
कृषीदुतांचे वैजी येथे आगमन
सावर्डे, ता. १४ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीअंतर्गत कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील कृषिदुतांचे वैजी (ता. चिपळूण ) येथे आगमन झाले. ग्रामीण कृषी कार्यानुभवअंतर्गत हे कृषिदूत जून ते सप्टेंबरअखेर कृषीविषयक माहिती तंत्रज्ञानांची तेथील शेतकऱ्यांबरोबर विचारविनिमय करणार आहेत. विद्यापिठाने शिफारस केलेल्या नवीन बीबियाणे, खतांची मात्रा, शेतीच्या नवीन पद्धती आदींबाबत शेतकऱ्यांना माहिती देणार आहेत. विनायक सावंत, प्रसाद पंडित, साहिल जमदाडे, श्रेयस जमदाडे, संग्राम माने, सुहास पाटील, ओंकार नांगरे, सत्यजित नांगरे, स्वप्नील तोडकर, सुशांत पाटील, श्रीशैल अवताडे, संकेत चहके हे कृषिदूत उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.