७०७४६
भारत शिक्षण मंडळाची नवीन इमारत सज्ज
वास्तुशांत सोहळा ः बालवाडी, प्राथमिक, गुरुकुलचे वर्ग भरणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये नवी इमारत विद्यार्थ्यांसाठी सज्ज झाली आहे. या नूतन इमारतीची नुकतीच वास्तुशांत करण्यात आली. येथे आता गो. भ. बियाणी बालमंदिर, आगाशे कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर आणि गुरुवर्य रामचंद्र जोग संजीवन गुरुकुलचे वर्ग एकाच वेळेत भरणार आहेत.
शाळेच्या पूर्वीच्या कीर सभागृहाच्या जागेवर ही नवी इमारत उभी राहिली आहे. ३३ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या या इमारतीमध्ये ३४ खोल्या ३ सभागृह आहेत. प्रशस्त, मोकळी, हवेशीर आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन आणि (कै.) शंकरराव पटवर्धन या बंधुद्वयींनी प्रामुख्याने विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत शिक्षण मंडळाची स्थापना केली. कोकणातील शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेला १२३ वर्षे झाली आहेत.
वास्तुशांती कार्यक्रमाचे यजमानपद संस्थेचे सहकार्यवाह संजय जोशी व सौ. जोशी यांनी भूषवले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष नंदकुमार साळवी, उपाध्यक्ष डॉ. अलिमियॉं परकार, कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर, देणगीदार रमेश कीर, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी, कार्यवाह सुनील वणजू, उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, चंद्रकांत घवाळी, विनायक हातखंबकर, संतोष कुष्टे, राजेंद्र कदम, स्वीकृत सदस्य विजय वाघमारे आदी उपस्थित होते. कृ. चिं. आगाशे विद्यांमदिरच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, गुरुकुलच्या प्रमुख सौ. मनाली नाईक, देव, घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. मधुरा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी रवींद्र साखरपेकर आदींसह सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.