सावंतवाडीत रक्तदान चळवळ बळकट
उल्लेखनीय कार्य ः तीसहून अधिक जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. १४) ‘ऑनकॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
हे रक्तदान शिबिर येथील रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. एसएसपीएम कॉलेज पडवे टीमच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. सुमित मालवणकर, रुपेश कुडतरकर, कैलास परब, मनीष राऊळ, सागर येरम, श्रेयस राऊळ, विष्णू राऊळ, लुमा जाधव, सखाराम नाईक, विठ्ठल राऊळ, ओंकार जाधव, राजेश पेडणेकर, महेंद्र पालव, नीलेश मुळीक, दत्तात्रय पंडित, केशव शिंदे, वासुदेव हळदणकर, दीपक मुंज, श्रीया माणगावकर, श्रेया निंबाळकर, राहूल सावंत, नीलेश लातये, सुयोग राऊळ, प्रसाद सावंत, सिद्धी दिवेकर, अमोल गोवेकर, सचिन रेडकर, सुधाकर रेडकर आदींनी रक्तदान केले.
रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ऑनकॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष प्रमोद भागवत, नॅब असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, कोमसाप शाखा सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ‘ऑनकॉल’चे सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, पत्रकार संघाचे सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गावस आणि रक्तपेढी तंत्रज्ञ (एसएसपीएम) मनीष यादव आदी उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामुळे रक्तदान चळवळीला सावंतवाडी तालुक्यात मोठा हातभार लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.