70944
निरवडे-वेत्ये-सोनुर्ली रस्त्याची
तातडीने डागडुजी आवश्यक
संदीप गावकर ः...अन्यथा आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः निरवडे आणि वेत्येमार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची आणि विशेषतः सोनुर्ली रेल्वे पुलावळील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोनुर्ली गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप गावकर यांनी दिला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण भागातील रस्ते नव्याने तयार केले जात असले तरी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या योग्य नियोजनाअभावी या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. निरवडे-वेत्येमार्गे सोनुर्ली या रस्त्यावर अनेक ठिकाणी बाजूपट्ट्या खचल्या आहेत, तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, विशेषतः निरवडे आणि वेत्ये मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाजवळच्या रस्त्याची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची तीव्र शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे पुलाजवळील हे खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.