कोकण

प्रवेशोत्सवाची गुढी अन् किलबिलाट

CD

71039
71040

प्रवेशोत्सवाची गुढी अन् किलबिलाट

बांदा केंद्रशाळा ः नवविद्यार्थ्यांचे औक्षण, दुचाकी रॅलीही लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर आज पीएम श्री जिल्हा परिषद बांदा क्र. १ केंद्रशाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी शाळा प्रवेशोत्सवाची गुढी उभारून दुचाकी रॅली, पायांचे ठसे व झाडांचे रोप देऊन नव विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला बांदा सरपंच प्रियांका नाईक, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिद्ध्ये, सदस्य हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर, श्रद्धा नार्वेकर, मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधून बांदा बाजारपेठेतून विद्यार्थ्यांची काढलेली दुचाकी रॅली लक्षवेधी ठरली. यावेळी विद्यार्थ्यांचे शाळेच्या गेटवर मिकीमाऊसने अभिवादन करून स्वागत केले‌. यावेळी विद्यार्थ्यांवर‌ पुष्पवृष्टी करून औक्षण केले‌ व झाडांचे रोप व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव करण्यात आला. या दिवशी शाळेसमोर प्रवेशोत्सवाची गुढी उभी केली होती. शाळेत पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे उमटवून विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आले. पहिल्या दिवशी शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे यांचे वितरण केले. दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संपदा सिद्ध्ये यांच्या सौजन्याने गोड जेवण देण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव यशस्वी होण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ, जे. डी. पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनीषा मोरे‌, कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी परिश्रम घेतले. यावेळी बांदा गावातील सर्व अंगणवाडी सेविका, तसेच मान्डेलीझ कंपनीच्या सहकार्याने बालरक्षा भारत या संस्थेतर्फे ईट राईट संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT