71075
आचऱ्यात घरावर झाड पडून
९० हजारांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १६ ः आचरा पिरावाडी येथे रविवारी (ता. १५) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने मुरलीधर कोळंबकर यांच्या घरावर झा़ड पडून ९० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पिरावाडी पोलिसपाटील तन्वी जोशी यांनी महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला दिली. आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, प्रतीक्षा सारंग यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.