Mumbai News: ऑफर पडली महागात! ग्राहकांच्या गर्दीने शोरूमला सेल रद्द करण्याची वेळ; इन्फिनिटी मॉलमध्ये गोंधळ

Malad Mall Stampede: मालाड इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शोरूममधील हा सेल रद्द करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त करत दुकानाबाहेर गोंधळ घातल्याची माहिती आहे.
Malad Infinity Mall Stampede situation

Malad Infinity Mall Stampede situation

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम येथील इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या मॉलमधील 'न्यू मी' या शो-रूममध्ये ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी जमली. मात्र प्रचंड गर्दी पाहून संबंधित दुकानदाराने दुकान बंद केले असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली. तसेच फसवणूक झाल्याच्या भावनेतून संतापलेल्या ग्राहकांनी दुकानाबाहेर गोंधळ घातला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com