काही सुखद---लोगो
rat17p27.jpg
71282
राजापूरः कात्रणांचा संग्रह उपक्रम विद्यार्थ्यांसमवेत राबवताना उपक्रमशील शिक्षक सुहास काडगे.
-----------
दोन वर्षात पटसंख्येत नऊपटीने वाढ
राजापुरातील कन्याशाळेची भरारी : भौतिक सुविधांमुळे गुणात्मक दर्जा उंचावण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः विविध कारणांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घटत आहे. त्यामध्ये आता शंभर वर्षापूर्वी सुरू झालेली आणि शहरातील पहिली मुलींची शाळा असलेल्या जिल्हा परिषदेच्या गोखले कन्याशाळेची पटसंख्याही सातत्याने घटत होती. काही वर्षापूर्वी सुमारे अडिचशे पटसंख्या असलेल्या या शाळेचा पट दोन वर्षापूर्वी फक्त १२ होता; मात्र भौतिक सुविधांच्या जोडीने विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा उंचावण्यात शाळेला यश आले. त्यामुळे दोन वर्षात पटसंख्येत भरारी घेताना तब्बल नऊपटींनी वाढ होऊन तो यावर्षी १०८ झाला आहे.
शाळेमध्ये भौतिक सुविधांच्या जोडीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारे उपक्रम राबवून पुन्हा एकदा प्रशालेची पटसंख्या वाढवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी कंबर कसली. राजाभाऊ रसाळ, नीलेश कुडाळी, दीपक दांडेकर, शिवाजी नागरवाड, राधिका गुणे यांसह अन्य दात्यांच्या सहकार्याने सुसज्ज मैदान, परसबाग, सांस्कृतिक सभागृह आदी भौतिक सुविधांची उभारणी करण्यात आली. टॅब, डेस्कटॉप आणि स्मार्टटीव्हीच्या माध्यमातून मुलांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. स्पर्धा परीक्षेतील यशाचा टक्का वाढवण्यासाठी भर दिला आहे. त्यामुळे शहरातील शाळांमधून नवोदयसाठी निवड झालेला एकमेव विद्यार्थी गोखले कन्याशाळेतील आहे. नासा-इस्रो दौर्यासाठीही या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पालकांसह विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजीचेही शिक्षण येथे दिले जात आहे. भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबवण्यात येत असलेले उपक्रम पालकांसह विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, विस्तार अधिकारी सुनील पाटील, केंद्रप्रमुख सुनील जायदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सायली भडाळे, पदवीधर शिक्षक सुहास काडगे, उपशिक्षिका सुचिता तवटे, मिताली आंगणे, अंगणवाडीताई शिवदे यांनी मेहनत घेतली. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी आपली दोन्ही मुले याच जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल केल्याने पालकांचाही शाळेवरील विश्वास वाढण्यास मदत झाली. तब्बल २२ मुलांनी पहिलीमध्ये नावे दाखल केली आहेत.
कोट
प्रशालेमध्ये भौतिक सुविधांची उभारणी करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीकडे लक्ष देण्यात आले आहे. नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेची गुणवैशिष्ट्ये आणि राबवण्यात येणारे उपक्रम शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांनी शहर आणि परिसरातील पालकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्यासमोर मांडल्या. गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापिका सायली भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका सुचिता तवटे, मिताली आंगणे यांसह आपण मेहनत घेत आहोत.
- सुहास काडगे, उपक्रमशील शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.