कोकण

मळेवाडमध्ये रस्त्यावर पडलेले झाड हटविले

CD

swt1925.jpg
71807
मळेवाडः रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मळेवाडमध्ये रस्त्यावर
पडलेले झाड हटविले
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २०ः मळेवाड-आरोंदा रस्त्यावर मुरकरवाडी येथे उन्मळून पडलेले व अपघातास कारणीभूत ठरणारे झाड आपत्ती व्यवस्थापन तथा सामाजिक कार्यकर्ते बापू मुळीक व रवींद्र तळववणेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तोडून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. मागील काही दिवसात पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे बरीच झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. काही झाडे रस्त्यावर पडून वाहतूक बंद झाली होती. अशावेळी कोंडुरे येथील सामाजिक कार्यकर्ते बापू मुळीक, मळेवाड येथील रवींद्र तळवणेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत घटनास्थळी तत्काळ दाखल होत रस्ता सुरळीत करण्याचे काम केले. त्यांच्या या कामाबद्दल वाहनचालक, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्यावरील धोकादायक झाड बाजूला करण्यासाठी बापू मुळीक, रवींद्र तळवणेकर, अतुल मुरकर यांनी मदत केली.
.................
‘गोगटे-वाळके’मध्ये
प्रवेश प्रक्रिया सुरू
बांदा, ता. २० ः येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात एम.ए. आणि एम.कॉम. च्या पहिल्या वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या महाविद्यालयात एम.ए. (मराठी) आणि एम.कॉम. (अकाउंटन्सी) या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमाची सोय असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वातंत्र्यापूर्वीच्या नोटांवर गांधी नव्हे, नेताजींचा फोटो! आरबीआयच्या आधीची बँक कोणती? वाचा नेताजींच्या चलनाची अज्ञात कहाणी

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

SCROLL FOR NEXT