rat20p11.jpg
71900
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सायकलवारीला झेंडा दाखवताना विठ्ठल मंदिर देवस्थानचे विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज, रवी गुरव.
rat20p12.jpg
71901
रत्नागिरी : सायकलवारीत सहभागी झालेले क्लबचे सदस्य. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
सायकलची चाके धावती पंढरीची वाट
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब; प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरातून सायकलवारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या (आरसीसी) दहा सायकलस्वारांनी प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन पंढरीची वाट धरली. राम कृष्ण हरी, असा गजर करत सायकलची चाके पंढरीच्या दिशेने निघाली. विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती झाल्यानंतर सायकलस्वारांना देवस्थानतर्फे श्रीफळ, पुष्प व प्रसाद देऊन आणि गाऱ्हाणे घालून आशीर्वाद देण्यात आला.
विठ्ठल मंदिर देवस्थानचे विजय पेडणेकर, प्रमोद रेडीज, वारकरी रवी गुरव यांनी सायकलवारीला झेंडा दाखवला. याप्रसंगी काकड आरतीसाठी नेहमी येणारे भाविक मोहन चंदरकर, चंद्रशेखर घडशी, रोहन शिर्के, उदय डाफळे, रत्नाकर हेगिष्टे, वसुधा शिर्के, स्मिता सनगरे, अक्षया रेडिज, क्लबचे सदस्य आणि धावपटू आदी उपस्थित होते.
रत्नागिरी ते पंढरपूर हा ३०० किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसांत पूर्ण करणार आहेत. २२ जूनला भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा आणि संमेलन करणार आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, विशाल भोसले, गजानन भाताडे, नारायण पाटोळे, अमित पोटफोडे, आरती दामले, राकेश होरंबे, विकास कांबळे, अक्षय पोटफोडे आणि विवेक खानविलकर हे सदस्य वारीमध्ये सहभागी झाले आहेत. हे सायकलपटू मलकापूर, कराडमार्गे उंब्रज येथे मुक्काम करणार आहेत.
उद्या (ता. २१) सकाळी मायणी, महूदमार्गे पंढरपूरला मुक्काम होईल. २२ ला भागवत एकादशीला सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. गेल्या चार वर्षांपासून सायकलवारी सुरू आहे. यंदा लातूर सायकल क्लबकडे आयोजनाची जबाबदारी आहे. प्रत्येक वर्षी पंढरपूर सायकल क्लब सर्व सायकलिस्टना सहकार्य करत आहे.
कोट
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने प्रथमच सायकलवारीचे आयोजन केले आहे. आजपासून वारीला सुरुवात झाली असून, क्लबच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्यामुळे व विठुरायाच्या आशीर्वादाने वारी यशस्वी होईल.
- महेश सावंत
कोट
प्रतिपंढरपूर असलेल्या आपल्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन सायकलवारी सुरू केली. पावसाळी वातावरण आहे व विठुरायाला भेटण्याची आस लागली आहे.
- आरती दामले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.