संक्षिप्त
सेवानिवृत्त कर्मचारी
संघाची उद्या सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी-दोडामार्ग तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघ, सावंतवाडी यांची मासिक सभा मंगळवारी (ता. २४) सकाळी १०.३० वाजता संघटनेच्या सावंतवाडी सालईवाडा येथील सद्गुरू अपार्टमेंट कार्यालयात आयोजित केली आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव संभाजी कांबळे व अध्यक्ष श्री. पणदूरकर यांनी केले आहे.
सह्याद्री पट्ट्यात
पावसाच्या सरी
सावंतवाडी ः तालुक्यासह शहरात शनिवारी (ता. २१) वातावरणात उष्मा वाढला होता; मात्र सायंकाळी सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
नांदगाव-वाघाचीवाडी
साकव वाहतुकीस बंद
कणकवली ः नांदगाव-वाघाचीवाडी येथून रामेश्वर मंदिरकडे जाणारा लोखंडी साकव पूर्णपणे जीर्ण होऊन नादुरुस्त झाला आहे. हा साकव वाहतूक किंवा रहदारीस योग्य राहिला नसल्याने शासकीय आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायतीमार्फत वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक लावला आहे. नवीन कामासाठी पालकमंत्री राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले.
सोलर एनर्जीबाबत
प्रशिक्षण कार्यक्रम
कणकवली ः राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज, विरार यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ५५ हजार ५५५ तरुणांना सोलर एनर्जी अवेअरनेस प्रोग्राम २०२५ अंतर्गत दोनदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोलर एनर्जीबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, या प्रशिक्षणाचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली या उपक्रमात सहभागी होणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत होत असलेल्या विविध उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी महाविद्यालयात करिअर कट्टा सेल स्थापन करण्यात आला आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक एकनाथ मांजरेकर व प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले आहे.
जाळ्यात अडकलेल्या
कासवाला जीवदान
मालवण ः दांडी झालझुलवाडी येथील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी समुद्राच्या लाटांमध्ये किनाऱ्यालगत घोस्ट नेटमध्ये कासव अडकलेल्या स्थितीत असल्याचे संतोष खवणेकर, प्रवीण (बाळा) पराडकर, महेंद्र कुबल, नारायण (दादू) लोणे या पारंपरिक मच्छीमारांच्या निदर्शनास आले. प्रवीण पराडकर, महेंद्र कुबल यांनी पाण्यात जाऊन ते कासव घोस्ट नेटसह उचलून किनाऱ्यावर आणले. त्यानंतर खवणेकर यांनी चाकूच्या साहाय्याने दोरखंड कापून ते कासव घोस्ट नेटमधून सोडविले व लोणे यांनी त्याला सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.