कोकण

गुरुमार्गामुळेच यशस्वी उद्योजक झालो

CD

rat23p2.jpg-
72457
रत्नागिरी : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार करताना रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर. डावीकडून सुयोगा जठार, प्रतिभा प्रभुदेसाई, विवेक पुरोहित, उमेश आंबर्डेकर, मानस देसाई, डॉ. शरद प्रभुदेसाई, अॅड. प्रिया लोवलेकर, चंद्रकांत हळबे, दिलीप ढवळे, सुहास ठाकुरदेसाई. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)

गुरूमार्गामुळेच यशस्वी उद्योजक झालो
रवींद्र प्रभुदेसाईः कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मराठी उद्योजकाची १०० कोटींची उलाढाल आहे का, असा प्रश्न केला होता. त्या वेळी एकही हात वर आला नाही पण मी सांगितले, पुढच्या दहा वर्षांत व्यवसाय वाढवतो. मी ५० कोटीवर व्यवसाय नेला; पण बाजारातून येणे बाकी राहू लागली. त्या वेळी डॉ. जयंत आठवले यांनी मार्ग दाखवला. अन् १०० कोटींच्यावर उलाढाल गेली. गुरूंच्याच आशीर्वादामुळे मला डॉक्टरेट मिळाली, असे प्रतिपादन पितांबरी उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापिठाने (पुणे) डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ व केजीएन सरस्वती फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे काम चांगले चालू असून सांगत त्यांच्यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत प्रभुदेसाई यांनी जाहीर केली.
संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई व सर्व संचालकांच्यावतीने प्रभू श्रीरामाची मूर्ती, राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. केजीएन सरस्वती फाउंडेशनतर्फे चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई आणि अशोक घाटे यांनीही प्रभुदेसाई यांचा सन्मान केला. कीर्तनसंध्या परिवारातर्फेही अवधूत जोशी व सहकाऱ्यांनी प्रभुदेसाई यांचा सन्मान केला. या वेळी अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रभुदेसाई यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास या पुस्तकाविषयी मनोगत मांडले. प्रभुदेसाई यांच्या कार्याविषयी अॅड. प्रशांत पाध्ये, डॉ. श्रीधर ठाकूर, प्रमोद कोनकर, ठाणे कऱ्हाडे संघाचे कार्यवाह संदीप कळके यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रभुदेसाई यांच्या हस्ते ‘कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास’ (पाचवी आवृत्ती) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाबद्दल डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. प्रिया लोवलेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT