72504
दुर्धर आजारांवर संशोधन आवश्यक
डॉ. आर. एस. कुलकर्णी ः तोंडवली फार्मसीत दीक्षांत समारंभ
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः ‘‘विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे महत्त्वाचे असून त्याचबरोबर मानवी मूल्ये व व्यवसायातील नीतिमत्त्वं जपली पाहिजेत. आज आपण फार्मसिस्ट होऊन बाहेर पडत असताना आपल्या पदवीचा उपयोग करून दुर्धर आजारांवर चांगले उपचार व्हावेत, यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे.
फार्मसी क्षेत्र कधीही न थांबणारे असल्याने कुठेही काम करताना ध्येय ठेवून काम करा,’’ असे आवाहन निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. कुलकर्णी यांनी केले.
कणकवली तालुक्यातील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवलीच्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. निवृत्त शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. विजय जगताप, संस्थेचे सचिव निखिल सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, प्राचार्य डॉ. तुकाराम केदार आदी उपस्थित होते.
डॉ. जगताप यांनी फार्मसी क्षेत्रातील नवनवीन नोकरीच्या संधी सांगितल्या. प्रा. केदार यांनी संधी आपण ओळखायला शिकण्याची गरज अधोरेखित केली. निखिल सावंत यांनी सकारात्मक दृष्टिकोनाचे जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या समारंभात ५५ हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये बी. फार्मसी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे दिलेल्या पदव्या समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्या. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. प्रा. सिल्वी घोन्साल्विस यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. उज्ज्वला खेडकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.