72778
जनतेच्या समस्यांना वाचा फोडा
विनायक राऊत ः सिंधुदुर्गनगरीत ठाकरे गटाची कार्यकारिणी बैठक
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम शिवसेनेने करायचे आहे. याच जोरावर आगामी निवडणुका लढवायच्या असून, यासाठी कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत केले.
शिवसेना नेते, माजी खासदार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ठाकरे शिवसेना पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक ओरोस शासकीय विश्रामगृह येथे आज झाली. यावेळी माजी खासदार राऊत बोलत होते.
ते म्हणाले, ‘लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अपयश आले असले, तरी खचून न जाता पक्ष संघटनावाढीचे काम सुरू ठेवा. जनतेची फसवणूक करून विरोधकांनी हा विजय मिळविला आहे. केंद्रात, राज्यात भाजप महायुतीची सत्ता आहे; मात्र तरीही जनता विविध समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे जनतेच्या समस्यांवर आवाज उठविण्याचे काम आपण केले पाहिजे.’
माजी आमदार नाईक यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कोकण उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, हरी खोबरेकर, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, मंगेश लोके, नंदू शिंदे, जयेश नर, बाळू परब, गणेश गवस, चंद्रकांत कासार, सुकन्या नरसुले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---
‘स्थानिक स्वराज्य’साठी कामाला लागा!
माजी खासदार राऊत म्हणाले, ‘बाळासाहेबांनी आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार अशा मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. इतर पक्षात मात्र आयात केलेल्या प्रस्थापितांना संधी दिली जाते. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका होणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी आतापासून कामाला लागा.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.