73054
संस्कार नॅशनल स्कूलमध्ये
ऑलिंपिक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे सोमवारी (ता. २३) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागरुकता आणि ऑलिंपिक मूल्यांची रुजवणूक करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात स्कूलचे चेअरमन शेखर जैन यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून केली. क्रीडाशिक्षिका धनश्री तुळसकर यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर यांनीही विद्यार्थ्यांना ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पटांगणावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये १०० मीटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. खेळांप्रमाणेच ऑलिंपिक खेळांविषयी विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळावी, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शाळेच्या डिजिटल क्लासरुममध्ये ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या विविध भारतीय खेळाडूंची माहिती देणारी एक माहितीपट (डॉक्युमेंटरी फिल्म) दाखविण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना ऑलिंपिकचा इतिहास, त्यातील भारतीय खेळाडूंचे योगदान आणि खेळांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.